👁 10 Views

तात्या लहाने…. पॉवर अंगार विधीन या चित्रपटाचे परळीत प्रदर्शन

पंढरपूर LIVE 13 जानेवारी 2018
डॉ.तात्याराव लहाने… आजच्या युवकांसाठी मोठे आदर्श -फुलचंद कराड
या चित्रपटामुळे पडद्यामागील डॉ.लहाने जगाला कळतील -डॉ.संतोष मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
तात्या लहाने…. पॉवर अंगार विधीन या प्रख्यात नेत्ररोग तज्ञ पद्‌मश्री तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारीत मराठी सिनेमाचे आज 12 जानेवारी रोजी परळीत प्रदर्शन करण्यात आले. तात्याराव लहाने यांचा जीवनपट सबंध देशासमोर आणणारा हा चित्रपट असून, नाथ चित्र मंदीर येथे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पहिल्या शो चे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्‌घाटनप्रसंगी नाथ चित्र मंदीर येथे बोलतांना फुलचंद कराड म्हणाले की, तात्याराव लहाने यांनी आयुष्यभर दिनदुबळ्यांची सेवा केली आहे. अनेकांना आपल्या हाताच्या जादुने दृष्टी दिली असून, त्यांचे कार्य हे आजच्या युवकांना नक्कीच प्रेरणादायी आहे. तर डॉ.संतोष मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पद्‌मश्री डॉ.तात्याराव लहाने हे पुढील पिढीसाठी कर्मश्रेष्ठ दीपस्थंभ आहेत, लाखो अंधांना दृष्टी देवून सुंदर सृष्टीचे त्यांनी दर्शन घडविले आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट निघणे आवश्यक होते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी निरपेक्ष सेवा करून मोठे कार्य उभे केले आहे. एवढे मोठा व्यक्ती असूनही स्वत: मात्र अगदी साधेपणाने ते राहतात. जगासमोरील डॉ.तात्याराव लहाने हे तर सर्वांनीच पाहीले आहेत. परंतू पडद्यामागील डॉ.तात्याराव लहाने हे आता पडद्यावर दिसतील असे मत डॉ.संतोष मुंडे यांनी व्यक्त केले.
नाथ चित्र मंदीर येथे तात्या लहाने…. पॉवर अंगार विधीन या चित्रपटाच्या पहिल्या शोच्या उद्‌घाटन प्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड, रा.यु.कॉं.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्यासह कॉंग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव मुंडे, जेष्ठ नेते श्रीराम मुंडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, ह.भ.प.संपत गित्ते गुरूजी, परळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, संपादक राजेश साबणे, जेष्ठ पत्रकार रामप्रसाद शर्मा, लक्ष्मीकांत कराड, नारायणराव मुंडे पाटील, फुलचंद मुंडे, श्रीहरी मुंडे नाथरेकर, दत्ताभाऊ मुंडे, विकास मुंडे, समाधान मुंडे ,सुग्रीव नागरगोजे, विश्वास महाराज पांडे, मारोती सातपुते आदींसह अनेकांची मोठी उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चित्रपटात मुख्य रिपोर्टरच्या भूमिकेत असलेले वैजनाथराव तांबडे यांनी केले तर गणी सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *