👁 5 Views

श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये शुक्रवारी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन

पंढरपूर LIVE 20 Jun 2018

पंढरपूर शहरातील नागरिकांचे जलपद चिन्हाची कपात करणे’ या विषयावर होणार विचार मंथन
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये येत्या शुक्रवारी (२२ जून २०१८ ) सकाळी ९.३० वाजता पंढरपूर शहरातील नागरिकाचे जलपद चिन्हाची कपात करणेया विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
          या कार्यशाळेचे आयोजन दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनिअर्स, सोलापूर विभाग (इंडिया)श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर, इंडिअन वॉटर वर्क्स असोशीएशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे विभाग आणि स्वेरी, पंढरपूर यांनी केले आहे. या कार्यशाळेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह. भ. प. शिवाजी मोरे, वारकरी सांप्रदायचे सचिव ह. भ. प. रामकृष्ण वीर महाराज, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, इंडिअन वॉटर वर्क्स असोशीएशनचे चेयरमन सुखदेव गरांडे, संयोजक पर्यावरण, द इनस्टीटूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), महाराष्ट्र राज्य, संपादक जर्नल ऑफ इंडिन वॉटर वर्क्स असोशीएशनचे प्रा. राजेंद्रकुमार सराफ आदी आपले विचार सादर करणार आहेत.  या कार्याशाळेमध्ये  येणाऱ्या पाण्याचे आणि  जाणाऱ्या पाण्याचे विषलेषण, शहराकरता लागणारे पाणी मिथक आणि सत्य, जलपदचिन्ह, दरम्यानच्या पाण्याची गळती, हरित प्लंबिंग वापरुन पाण्याचा वापर कमी करणे, विना राजस्व पाणी वापर कमी करणे, पाण्याचा फेरवापर, सांडपाण्यावर नैसर्गिक प्रक्रिया करुनपाणी शुद्ध करणे, सांडपाण्याचे संकलन व प्रक्रिया ह्याचे विकेंद्रीकरण, उत्तम जलव्यवस्थापन व त्याची यशोगाथा या विचारांची देवाण घेवाण होऊन पुढील कार्याची दिशा ठरवता येणार आहे. 

तसेच कार्यशाळेमध्येपंढरपुरातील सर्व भागधारक, पुजारीदुकानदारस्थानिक संस्थाधर्मशाळा प्रमुखहॉटेल व्यवस्थापक,बिल्डरविश्वस्तमंदिर व्यवस्थापन व वारकरी हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वयकसिव्हील इंजिनिअरींगचे प्रा. एस. एम. माळी असून याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *