पंढरपूर LIVE 21 Jun 2018
दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] ९९३०११२९९७
९८ व्या नाट्य संमेलनात मेजवानी बालनाटये, संगीत, एकांकिका,
सकाळी पहाटे ६ वाजता किशोरी आमोणकर रंगमंचावर गायक कलाकार राहुल देशपांडे, आनंद भाटे, मंजुषा पाटील, सावनी शेंडे यांचा स्वरांनी रंगत आणली,
सकाळी १० वाजल्या पासून बालनाटये महाकवी कालिदास नाट्यमंदिर मध्ये सादर करण्यात आली. ” बालनाटय ” तेलेजू ” चा प्रयोग नाट्यपरिषद उपनगरीय शाखा आणि रंगसंवाद प्रतिष्ठान संस्थेने सादर केला, लेखन डॉ मीरा शेंगडे यांचे होते, पार्श्वसंगीत आणि दिगदर्शन मिहिका शेंगडे हिने केले होते, प्रकाश योजना गुरु वठारे यांनी सांभाळली होती. या मध्ये आर्या कुलकर्णी, शिवानी पवार, सांची कांबळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या, हे नाटक नेपाळच्या कुमारी देवी या लोककथेवर आधारित आहे. नेपाळमध्ये मुलगी ऋतुमती होण्याआधी तिला ” कुमारीदेवी ” मानलं जाते, तिची प्रतिष्ठापना केली जाते, ओघाने तिचे दर्शन घेणे, चरणस्पर्श पवित्र मानला जातो, तिला देवी म्हणून देव्हाऱ्यात बसवतात, ह्यामध्ये तिच्या बालपणीच्या भावनांचा विचार तिचे आई–वडील करीत नाहीत, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवायचे असते. त्या मुलीला खेळायचे असते, बागडायचे असते पण तिला तिचे बालपण विसरायला लावून तिला देवी च्या जागी बसवतात. तिला दैवत्वाचा मुखवटा दिला जातो तिला वेगळ्याच पठडीमध्ये जगायला भाग पडतात, ह्या सर्व रूढी आणि परंपरेवर हे नाटक भाष्य करते, हे नाटक बालकांच्या भावविश्वाचा संबंधित आहे आणि तो पालकांनी गंभीरपणे घ्यायला हवा आहे. बालकांचे भावविश्व त्यांच्या पासून हिरावून घेऊ नका यावर हे नाटक विचार करायला लावते.

” जंबा बंबा बु ” हे नाटक ग्रिप्स थिएटर प्रस्तुत – महाराष्ट्र कल्चरल सेंटर ने सादर केलं आहे, लेखन श्रीरंग गोडबोले–विभावरी देशपांडे यांचे असून दिगदर्शन राधिका यांनी केलं आहे. यामध्ये देवेंद्र सारळकर, श्रीकांत पित्रे, हर्षद राजपाठक, अश्विनी फाटक–काळे, ऋचा आपटे, सक्षम कुलकर्णी यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. जंगल बुक मध्ये राहण्याऱ्या ” मोगली ” ची मध्यवर्ती भूमिका असून हा मोगली जंगल सोडून शहरात येतो, आणि तेथे त्याला वेगळे अनुभव येतात, शाळेत शिकण्यासाठी तो शाळेत जातो तेथे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, शहरातील अडचणी त्याला समजतात पण तो मात्र आपल्या मित्राना मदत करीत रहातो, त्याचे मित्र हिंदू–मुस्लिम–ख्रिस्चन असे असतात, सर्वांवर प्रेम करणे त्यांचा आदर करणे हे मोगली करीत असतो, हे नाटक संस्कार, धर्म जात इत्यादींवर भाष्य करते. एकमेकाला आधार देऊन प्रेम भावनेने जीवन जगावे असा संदेश देणारे नाटक आहे.
” इतिहास गवाह है ” पुणे येथील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय यांनी ही एकांकिका सादर केली, लेखन चिन्मय देव / शुभम गिजे यांनी केलं असून दिगदर्शन ऋषी मनोहर यांनी केलं आहे. आजच्या काळावर भाष्य करणारे नाटक असून इतिहासावर आधारलेल्या घटना सादर कारणात त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्या सादर केल्या जाव्यात असा संदेश हे नाटक देते, कल्पनेतला ऐतिहासिक राजा आणि त्याच्या भोवती फिरणारे कथानक असून त्याकाळातील भव्यता दाखवली आहे.
” साडे सहा रुपयाचं काय केलेस ? ” हि एकांकिका नाट्य परिषद महानगर शाखा सोलापूर यांच्या तर्फे सादर करण्यात आली, लेखन किरण पोत्रीकर, कलाकार श्रीनिवास देशपांडे आणि अश्विनी तडवलकर हे होते. भावनाप्रधान नाट्यकृती असून मनाचा ठाव घेणारी अशी कलाकृती आहे. प्रदीप आणि माधवी या जोडप्याची कथा आहे. प्रदीप हा कलाकार असून पूर्वी त्याने केलेल्या भूमिका गाजलेल्या असतात, पण आता काही कारणामुळे त्याला काम मिळत नाही, त्याचा स्वभाव हा स्वाभिमानी असल्यामुळे तो आपणहून काम मागायला कुठेच जात नाही, तसा तो प्रयत्न करतो पण त्याला यश येत नाही, त्याची बायको माधवी हि नोकरी करून संसाराचा गाडा ओढत असते, प्रदीपला काम नाही त्यामुळे घरी बसून असतो, त्यामुळे आपापसात त्यांचे जोरजोरात खटके उडतात, घटस्फोट घेण्यापर्यंत पाळी जाते.एकमेकांची चिडचिड होते, भांडणे होतच असतात, प्रदीप आपला खर्च चालविण्यासाठी तो माधवीच्या पर्स मधून पैसे चोरत असतो सुरवातीला माधवी दुर्लक्ष करते पण शेवटी दोघे विभक्त होण्याचे ठरवितात, त्याच रात्री ती प्रदीप ला विचारते कि तू घेतलेल्या रुपयांचे काय केलंस ? प्रदीप सांगतो कि एक सिगरेट चे पाकीट घेतलं आणि आज आपल्या लग्नाचा वाढदिवस असल्याने मी तुझ्यासाठी एक गजरा घेतला, तुझ्या डोक्यात मी माळला आहे, तो प्रेमाचे प्रतीक असलेला गाजला आणतो आणि पुढे काय ? शेवट गोड कि सारेच गोड होते,,,, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कुटुंबवत्सल जोडप्याची कथा भाव–भावनेचे प्रसंग असलेली हि एकांकिका परिणाम साधून जाते…
” चित्र– विचित्र ” नाट्य परिषद अमरावती शाखा ने हि एकांकिका सादर केली, लेखन / दिगदर्शन विशाल रमेश सराफ,, या एकांकीच्या विषयी विशाल सराफ यांनी सांगितले कि, एका घडलेल्या घटनेवरून ह्या एकांकीचेची कल्पना सुचली, समाजात वावरत असताना बऱ्याच ठिकाणी नियमावली पाळली जात नाही, तसे केलेलं आढळून येत नाही, किंवा लोकशाही, संविधान मध्ये जे लिहलेलं आहे त्याच पालन केलेलं दिसत नाही, खरी लोकशाही जी आहे त्याचे पालन व्हायला हवे असा संदेश हे नाटक देते,,,
” शिकस्त – ए – इष्क ” ड्रीम थिएटर्स मुंबई ने हि एकांकिका सादर केली, लेखन / दिगदर्शन सिद्धार्थ साळवी यांचं आहे. मुस्लिम समाजातील ” इद्दत ” या प्रथेमुळे होणाऱ्या विधवा स्त्रियांच्यावर हे नाटक भाष्य करते, नाटकाचा विषय हा गंभीर आहे. एका प्रेम कथेची शोकांतिका ह्या मध्ये मांडली आहे, एक हृदयस्पर्शी कहाणी ह्यात पाहायला मिळेल, एक मुस्लिम मुलीच्या भोवती कथानक फिरते, एका मुस्लिम मुलीचा विवाह शौहर नावाच्या मुलाबरोबर ठरतो, पण त्यामुलीचे प्रेम त्याच्यावर नसते, पण तिला लग्न करावे लागते, एक दिवस शौहर हज च्या यात्रेला जातो पण तेथे त्याचा मृत्यू होतो, ती मुलगी विधवा बनते, त्याचवेळी तिचा दीर त्याघरात येतो त्या दोघांचे सूत जमते, पण त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने ती मुलगी ” मृत्यू ” ला जवळ करते, तिचे प्रेम सफल होत नाही. त्या स्त्रीच्या मनातील भाव–भावनाचे हिंदोळे छान व्यक्त झाले आहेत, नाटकाची मांडणी हि प्रवेशागणिक उंची गाठत जाते, नाटकातील सर्वच कलाकारांनी कामे छान केली आहेत प्रत्येक व्यक्तिरेखा हि महत्वाची असून ती स्वतंत्र आहे, प्रकाश योजना उत्तम, सादरीकरण मनाचा वेध घेते,,
” अपूर्व मेघदूत ” आरलिन प्रोडक्शन पुणे यांनी ह्या नाटकाचे सादरीकरण केलं असून नाटकाचे लेखन गणेश दिघे यांचे आहे, हे नाटक १९ अंध कलाकारांनी सादर केलं आहे, महाकवी कालिदास च्या ” मेघदूत ” ह्या काव्यावर आधारित ह्या नाटकाची बांधणी केली आहे, या नाटकात नृत्य, नाट्य, काव्य इत्यादीचा समावेश उत्तमपणे केला असून अंध कलाकांरानी केलेली ही कलाकृती मनाला भावते.
” रंगयात्रा – संगीत रंगभूमीचा प्रवास “,,,, हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ने सादर केला, ह्या मध्ये सुरवाती पासून संगीत रंगभूमीचा आढावा घेतला असून त्यामध्ये नाटककार – कलाकार – त्यांचे लेखन इत्यादींवर उत्तमपणे भाष्य केलं असून ते संपूर्णपणे माहिती पूर्ण असे असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली, सोबत संगीत रंगभूमीवर काम करणाऱ्या चारुदत्त आफळे, मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते, नचिकेत लेले, केतकी चैतन्य इत्यादी मान्यवर कलाकारांनी नाट्यपदे उत्तमपणे सादर केल्याने कार्यक्रमाची उंची वाढली,
ह्या सर्वच कार्यक्रमाना रसिक जाणकार प्रेक्षकवर्ग हजर होता, नाट्य संमेलनाचे सर्वानी कौतुक केले संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com