👁 8 Views

मराठा समाजातील विद्यार्थी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित…राज्य शासनाने निदान शैक्षणिक क्षेत्रात फक्त घोषणाबाजी करू नये :- अभाविप चा आरोप

पंढरपूर LIVE 23 Jun 2018


महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमामध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने मध्यंतरी घेतला परंतु त्याचा अध्यादेश शिक्षणसंस्था व महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. नुकतीच महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. 
याच विषयाला धरून आज अभाविप पुणे महानगराच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री अभिजीत पाटील, पुणे महानगर सहमंत्री अनिल ठोंबरे,  गणेशखिंड नगर मंत्री योगेश्वर राजपुरोहित,येरवडा नगर मंत्री शुभम भूतकर,शार्दूल भेगडे, विशाल जवंजाळ, सुदर्शन खाडे, सिद्धार्थ गिरमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमामध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने मध्यंतरी घेतला अभाविप या निर्णयाचा स्वागत करते, परंतू या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये. राज्यसरकारने निदान शैक्षणिक क्षेत्रात तरी फक्त घोषणाबाजी करू नये. राज्यशासनाचा आम्ही निषेध करतो व याविषयात त्वरित अध्यादेश नाही काढला तर आम्ही निर्णायक आंदोलन करू असा इशारा योगेश्वर राजपुरोहित यांनी राज्य सरकारला दिला.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *