👁 7 Views

राजस्थानी मंडळाकडून महेश नवमी साजरी

पंढरपूर LIVE 27 Jun 2018 

पंढरपूर :  पंढरपूर येथील राजस्थानी मंडळाच्या वतीने विविध धार्मिक उपक‘म करुन महेश नवमी साजरी करण्यात आली. माहेश्वरी नवमी ही जेष्ठ शुक्ल नवमी हा माहेश्वरी समाजाचा स्थापना दिवस असून याच दिवशी भगवान महेशानी माहेश्वरी समाजाची स्थापना करुन हा समाज व्यवसायिक राहील अशी अ‘यायिका आहे.
पंढरपूर शहरातील राजस्थानी मंडळांनी लक्ष्मणबाग येथील देवस्थान येथे रक्तदान शिबिर भरण्यात आले होते. यामध्ये राजस्थानी मंडळाच्या महिलावर्गांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तर मंदिरामध्ये सुंदरकांड हासंगीतमय पाठ कऱण्यात आला. नंतर झालरिया पिठाधिश्वर भागवताचार्य श्री भूदेवाचार्यजी यांच्या हस्ते माहेश्वरी देवतेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राजस्थानी मंडळाचे अध्यक्ष डॉ.पारस राका यांच्या हस्ते रक्तदान करणार्‍या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यादिवशी राजस्थानी मंडळाच्या वतीने भाविकांसाठी व राजस्थानी समाजासाठी महाप्रसाद देणयत आला.
महेश नवमी यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ.पारस राका, सुरेश जोशी, दिनेश खंडेलवाल, श्रीनिवास खंबाणी, बाळासाहेब खंडेलवाल, वासुदेव जोशी, वेधप्रकाश गुप्ता, संजय खंडेलवाल, सतिश खंडेलवाल,  बिहारीलाल लकेरी, महेश व्यास, सतीश आसावा, अमरीश गोयल, मनोज राठी, शामसुंदर तापडिया, बबलू मर्दा, विष्णुकांत मंत्री, श्रीकांत मंत्री, शिव खंडेलवाल, शिवम खंडेलवाल, बाळसाहेब राका, मोहन धूत आदींनी परिश्रम घेतले.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *