👁 7 Views

पंढरीत शाहू महाराजांचे स्मारक व्हावे…पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनात ठराव : इंगळे, सर्वगोड यांना नामदेव ढसाळ जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पंढरपूर LIVE 27 Jun 2018

पहिले परिवर्तन साहीत्य संमेलनामध्ये राजा इंगळे यांना नामदेव ढसाळ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर, लोकमतचे संपादक राजा माने, ज्येष्ट पत्रकार उत्तम कांबळे, श्रीमंत कोकाटे, लक्ष्मणराव ढोबळे, कवी प्रा़ प्रशांत मोरे, बा़ ना़ धानोरे, ह़ भ़ प़ रामदास ऊर्फ शिवराज महाराज जाधव, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, कोषाध्यक्ष सचिन कांबळे
पंढरपूर : पंढरपुरात राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक व्हावे, भीमा-कोरेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधारावर कारवाई व्हावी, मराठा समाजास आरक्षण द्यावे, विचारवंतांवरील हल्ले रोखावे व त्यांना संरक्षण द्यावे यासह आठ ठराव लोकराजा राजर्षी छ़ शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आले़ 
तसेच याप्रसंगी राजा इंगळे व सुनील सर्वगोड यांना पँथर नामदेव ढसाळ जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते़ व्यासपीठावर नियोजन आयोगाचे माजी सदस्य खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर, लोकमतचे संपादक राजा माने, ज्येष्ट पत्रकार उत्तम कांबळे, श्रीमंत कोकाटे, लक्ष्मणराव ढोबळे, कवी प्रा़ प्रशांत मोरे, बा़ ना़ धानोरे, अमरजीत पाटील, ह़ भ़ प़ रामदास ऊर्फ शिवराज महाराज जाधव, प्रा़ डॉ़ विजय मोरे, परिवर्तन साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष किर्तीपाल सर्वगोड, उपाध्यक्ष वैभव माने, सचिव संतोष गायकवाड, कोषाध्यक्ष सचिन कांबळे आदी उपस्थित होते़ 
यावेळी विविध आठ ठरावाचे वाचन परिवर्तन साहित्य संमेलन समितीचे उपाध्यक्ष वैभव माने यांनी केले़ 
तत्पूर्वीच्या सत्रात शिवशाही ते भीमशाही या विषयावर प्रा़ डॉ़ विजय मोरे यांनी व प्रा़ श्रीमंत कोकाटे यांनी विचार मांडले़ प्रा़ डॉ़ विजय मोरे म्हणाले, ज्या दिवशी बहुजन व मराठा समाज एक होईल, तेव्हा परिवर्तन अटळ असे सांगून त्यांनी परिवर्तनातील विविध टप्पे कथन केले़ श्रीमंत कोकाटे म्हणाले, सध्या देशातील परिस्थिती बिकट आहे़ स्फोटक वातावरण निर्माण झालेले आहे़ लोकशाही परिणामी संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे़ पाठ्यपुस्तकातून चुकीचा इतिहास मुलांना सांगितले जाते़ शिवशाही असो वा भीमशाही ही नेहमीच शेतकºयांच्या पाठिशी होती़ शिवरायांनी आणि डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकºयांना कशा प्रकारे मदत केली याची सविस्तर माहिती श्रीमंत कोकाटे यांनी सांगितली़ 
याचा झाला गौरव
औरंगाबाद येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील छायादेवी लोखंडे, शशीकांत बाबर, युसूफ बागवान, राजू जमदाडे, विष्णू धार्इंजे, कुमार ढवळे, अरविंद कांबळे, अंबादास शिंदे, रामचंद्र कांबळे, दिलीप देवकुळे या पँथरांचा गौरव याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला़    


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *