पंढरपूर LIVE 1 July 2018
राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतचे गेल्या दोन वर्षांपासून खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार पदी नियुक्तीसाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू होते. सरकार दरबारी हा विषय दीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार अमित ठाकरे यांनी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय मांडला होता. या चर्चेनंतर अखेर शनिवारी प्राजक्ताला तिची नायब तहसिलदारपदी नियुक्ती करत असल्याचे पत्र देण्यात आले.
प्राजक्ता सावंत ही २०१० आणि २०११ मधील राष्ट्रीय बॅडमिंटन विजेती आहे. तिने २००४ ते २०१४ या कालावाधीमध्ये भारताचे नेतृत्व करत सात पदके कमावली आहेत. मे २०११मधील निर्णयानुसार प्राजक्ताने अर्ज दाखल केला होता. मात्र तेव्हा ती बारावी उत्तीर्ण असल्याने तिला ‘क’ दर्जाचे पद देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर तिने पदवी प्राप्त केली. तिला नायब तहसीलदार पद देण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. २०१६ साली ती ‘अ’ दर्जाच्या पदासाठी न्यायालयात गेली. मात्र तिच्या कामगिरीनुसार नायब तहसीलदार पद देण्यात येईल, हे स्पष्ट झाल्यानंतरही हा विषय प्रलंबित होता. त्यासाठी तिने अमित ठाकरेंची भेट घेतली. विनोद तावडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर शुक्रवारी तिच्या हातात नियुक्तीपत्र पडले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com