👁 5 Views

मृतांच्या कुटूंबियांचा हंबरडा ऐकून प्रत्येकाचे काळीज हेलावले… अफवेचे बळी ठरलेल्या ‘त्या चौघांच्या’ मृतदेहावर मंगळवेढा तालुक्यातील खवे येथे अंत्यसंस्कार

पंढरपूर LIVE 3 July 2018

 
मंगळवेढा- राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील हत्यांकांडात मृत्युमुखी पडलेल्या दादाराव भोसले, भारत माळवे, भारत भोसले आणि अप्पा इंगोले या चौघांच्याही मृतदेहांवर अतिशय शोकाकूल वातावरणात मंगळवारी सकाळी 10 वाजता खवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. खवे गावावर शोककळा पसरली असून तालुक्याच्या विविध भागांतील हजारो लोक या अंत्यविधीस उपस्थित होते. मृतांच्या कुटुंबांतील  महिला, मुलांचा हंबरडा ऐकून यावेळी उपस्थित हजारो नागरिकांचेही डोळे पाणावले.  मृतांच्या कुटूंबियांचा हंबरडा ऐकून प्रत्येकाचे  काळीज हेलावले… 

दरम्यान, मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या मंगळवेढा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण शहरात स्मशान शांतता पसरली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. तालुक्यातील कचरेवाडी, शेलेवाडी, गणेशवाडी, पाठखळ, खुपसंगी, जुनोनी, नंदेश्‍वर, महमदाबाद हु., मानेवाडी, हुन्नुर, लवंगी, निंबोणी, खवे, जित्ती, शिरनांदगी, रेवेवाडी या गावाशिवाय राज्यातील कानाकोपर्‍यात असलेला समाज बांधवानी खवे गावाकडे धाव घेतली,
तत्पूर्वी धुळे येथून आणलेले चारही मृतदेह मंगळवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या गावी दाखल झाले. नातेवाईकांतून मारेकर्‍यांबद्दल संताप व आक्रोश पहायला मिळत होता. समाजातील काही शिक्षित नागरिकांकडून या प्रकरणात राहईनपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पोलिस पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मृतांच्या वारसांना योग्यतेप्रमाणे नोकरी द्यावी व इतर मागण्या याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय खवे व मानेवाडीतील मृतांचा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांना घेतला. 
यावेळी  उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मृत कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी  10 लाख रुपये तत्काळ आर्थिक मदत आणि घरातील वारसास शासकीय नोकरी देण्याचे लेखी पत्र लिहून दिल्यानंतर  उपस्थित नातेवाईकांचा आक्रोश थांबला व अंत्यविधी संपन्न झाला. मानेवाडी येथे ही अप्पा इंगोले या युवकावर अंत्यसंस्कार  करण्यात आले.
याप्रसंगी आ. भारत भालके यांच्यासह उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे,  प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शिवसेना तालुकाध्यक्ष  प्रा.येताळा भगत, सचिन शिवशरण, मच्छिंद्र भोसले, गोरख इंगोले, अन्य समाज बांधवासह हजारो नागरिक खवे येथे उपस्थित होते. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ  मंगळवारी मंगळवेढा बंदची हाक दिली होती. या बंदला मंगळवेढेकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मंगळवेढा पूर्णपणे बंद झाले आहे .शिवाय ग्रामीण भागात ही बंद पाळण्यात आला. शहरातील मोठे व्यापारी, लहान व्यावसायिक, छोटे दुकानदार, हातगाडे आदी व्यावसायिकानी आपली दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. बस स्थानक  परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारही बंद होते. शहरात जागो जागी पोलिस बंदोबस्त असून बंदमुळे शहरात  शुकशुकाट पसरला आहे. 
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *