👁 6 Views

श्री विठ्ठल अभियांत्रिकीचा आशुतोष जवंजाळ सोलापूर विद्यापिठात सर्व विभागात प्रथम स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’चे वर्चस्व कायम

पंढरपूर LIVE 4 July 2018

श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डीग्री इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या अंतिम परीक्षेत आशुतोष जवंजाळ हा सोलापूर विद्यापिठातील अभियांत्रिकीच्या सर्व विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविल्यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी सत्कार केला. याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थी सोबत प्राध्यापक वर्ग .

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष वार्षिक परीक्षेत आशुतोष संतोष जवंजाळ यांनी ९५.५७ टक्के गुण मिळवून सर्व शाखांमधून सोलापूर विद्यापिठात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला यावरून ‘पंढरपूर पॅटर्न’मुळे येणाऱ्या यशाची परंपरा कायम आहे असे दिसून येते.

          शिस्त व आदरयुक्त संस्कार याचबरोबरच परीक्षेतील निकाल आणि कॅम्पस प्लेसमेंट या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात. या सर्व गोष्टींकडे स्वेरीच्या व्यवस्थापनाचे व प्राध्यापकांचे विशेष लक्ष असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील पालकांच्या मनात ‘स्वेरी’चे विश्वासाचे स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या आशुतोष संतोष जवंजाळ यांनी ९५.५७ टक्के गुण मिळवून सोलापूर विद्यापिठात प्रथम येण्याचा मान मिळविला तर अनुक्रमे तिसरा क्रमांक महेश दिलीप फुटाणे (९४.७१ टक्के),चौथा कपिल भिमराव रोंगे (९४.१४ टक्के),पाचवा रोहित रमेश बादगुडे (९३.६४ टक्के),सातवा शुभम जयमिलिंद कदम (९३.०० टक्के),आठवा शुभम हरी शिंदे (९२.५७ टक्के), नववी सोनाली उमेश चव्हाण (९२.४३ टक्के) यांनी मिळविला असून  प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये २१ विद्यार्थ्यांना सी.जी.पी.ए. नुसार १० पैकी १० ग्रेड पॉइंट मिळाले आहेत. तसेच ९ ग्रेड पॉइंट पेक्षा जास्त असणार्‍याविद्यार्थ्यांची संख्या १४१ आहे. तसेच तब्बल २२६ विद्यार्थ्याना विशेष प्राविण्य श्रेणी मिळाली आहे. मिळालेल्या यशाबद्धल बोलताना आशुतोष जवंजाळ म्हणाले की ‘काही विषयाच्या महत्वपूर्ण संकल्पना शिक्षकांनी प्रयोगाच्या माध्यमातून शिकविल्याने त्या लक्षात राहण्यास मदत झाली.’ यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे इतर विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ.सतीश लेंडवे, प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, शैक्षणिक कार्याचे अधिष्ठाता डॉ. पी.एम.पवार, सर्व अधिष्ठाता, वर्गशिक्षक, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.   
 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *