पंढरपूर LIVE 4 July 2018
(प्रतिकात्मक छाया)
* हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याविषयी कृती समितीचे सचिव श्री. पुरुषोत्तम लंके यांची पोलिसांत तक्रार दाखल
पंढरपूर, ४ जुलै (वार्ता.) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती ही मंदिर, परिवार देवता आणि मंदिर समितीची गोशाळा यांचे व्यवस्थापन पहाते. २ वर्षांपूर्वी गोशाळेतील गायींचा उपासमारीमुळे प्लास्टिक, कापड, तारा, चपला खाल्ल्याने मृत्यू झालेला आहे. मृत गायींच्या शवविच्छेदनातून ही माहिती समोर आली आहे, आत्ताही तीच परिस्थती असून गोशाळेतील गायी कापड, कागद, प्लास्टिक खातांनाचे चलचित्र प्रतिथयश वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे. गोमाता ही हिंदु धर्मियांची पूजनीय असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने भारतीय दंड विधान कलम २९५ आणि कलम ४२९ अंतर्गत गोशाळेचे प्रमुख, संबंधित कर्मचारी, तसेच सामुहिक दायीत्व असलेले मंदिर समितीचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, विश्वस्त यांच्यावर गुन्हा नोंद करावा, तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर विविध कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही व्हावी, अशी तक्रार विठ्ठल-रुक्मिणी कृती समितीचे सचिव श्री. पुरुषोत्तम लंके यांनी पोलीस ठाणे येथे नोंद केली. यावेळी ‘संबंधितांची चौकशी करू’, असे आश्वासन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडोळे यांनी दिले.
या वेळी सर्वश्री बजरंग दलचे सुनील बाबर, हिंदु महासभेचे बाळासाहेब डिंगरे, अभयसिंह कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे सौरभ थिटे, मंदिर संरक्षण कृती समितीचे प्रतापसिंह साळुंके, गणेश लंके, वीर बाजीप्रभू प्रतिष्ठानचे ओंकार कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, वनवासी कल्याण आश्रमचे सारंग बडोदकर, हिंदु जनजागृती समितीचे शशीशेखर पाटील, हिदुत्वनिष्ठ वीरेंद्रसिंह उत्पात, रामेश्वर कोरे आदी उपस्थित होते.
तक्रारीत म्हटले आहे की,
१. यापूर्वीची आणि सध्याची स्थायी समिती आणि कर्मचारी यांच्याकडून व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. मंदिर समितीच्या गोशाळेत १५० गायींसह गोवंश आहेत. यांचे पोषण आणि औषधे यांसाठी प्रतिवर्षी ४२ लाख रुपये मंदिर समितीकडून भाविकांच्या अर्पणातून मिळालेल्या उत्पन्नातून व्यय केले जातात; मात्र तरीही अनेक गायींचा मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकाराविषयी कृती समितीने निवेदने, अंदोलने केली आहेत.
२. ‘News18 लोकमत’ या प्रतिथयश वाहिनीवर गोशाळेतील भोंगळ कारभाराविषयीचे चलचित्र प्रसारित करण्यात आले, तसेच तेथे संबंधित व्यवस्थापक अरुण सलगर उपस्थित असून त्याने घडल्या प्रकाराविषयी देशमुख नावाचा मंदिर समितीचा वाहन चालक उत्तरदायी असल्याचे सांगितले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे अन्य गायींचाही मृत्यू होऊ शकतो. याविषयी संपूर्ण महाराष्ट्रात पुष्कळ संताप व्यक्त होत आहे.
३. मी हिंदू असल्याने, तसेच गोमाता ही हिंदूंची पूजनीय असल्याने या प्रकाराने माझ्यासह सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा अपप्रकार म्हणजे गायींची हत्याच आहे. गायींना सांभाळण्याचे दायीत्व असतांनाही त्यांना उपाशी ठेऊन Prevention of Cruelty to Animals Act च्या कलम ११ (एच) आणि (आय) यानुसार अपराध केला आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com