पंढरपूर LIVE 5 July 2018
नागपूर, दि. 5 : आज राजकारणात येण्याची युवकांना मोठी संधी आहे. राजकारणात येवून समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले.
48 व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, अवर सचिव सुनील झोरे तसेच विविध विद्यापीठाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
आमदार श्रीमती शिंदे म्हणाल्या, राजकारणात येण्या अगोदर 2004 साली जाई-जुई संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. समाजकारणांसाठीच राजकारणात प्रवेश केला आहे.
देशाची एकता हीच देशाची शक्ती आहे. महापुरुषांच्या विचाराचे प्रसारण एका चौकटीत न ठेवता ते प्रसारीत करणे हे प्रत्येक युवकाचे कर्तव्य आहे. मी एक भारतीय आहे. प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान बाळगून देशाची अखंडता राखण्यात आपली भूमिका बजावली पाहिजे.
आजही महिला वरिष्ठ पदावर गेलेल्या पुरुषांना आवडत नाही. महिलांविषयी युवकांनी आदर ठेवला पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याशिवाय महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन स्त्रियाबद्दल असलेली समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.
युवकांमध्ये संवाद खूप महत्वाचा असून यामधून खूप काही शिकता येवू शकते. महिलांना आरक्षण दिले गेले आहे. राजकारणात येण्यासाठी अनेक पक्ष आहेत. या पक्षांच्या माध्यमातून राजकारणात येवू शकतात. याविषयी युवकांनी मानसिकता बदलायला हवी, असेही त्या शेवटी म्हणाल्या.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com