👁 6 Views

श्री विठ्ठल अभियांत्रिकी (डिप्लोमा) महाविद्यालयामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन व कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद

पंढरपूर LIVE 7 July 2018

विद्यार्थांना आता डिप्लोमा प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही
प्रक्रिया १६ जुलै पर्यंत चालणार !
पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.)क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून गुरुवार,दि २१ जून २०१८ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेकागदपत्रे पडताळणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेस सतराव्या दिवशी देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.                                                                           
              डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंग प्रथम वर्ष प्रवेश सन २०१८-१९ करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे,कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई  येथील मा. संचालकतंत्र शिक्षण संचालनालयमहाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरींग (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शनपालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंगचे अकरावे वर्ष आहे.स्वेरीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाने  उज्ज्वल यशाची पंरपंरा यंदा देखील कायम राखली आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा (पॉलिटेक्निक) प्रवेशाकरिता दहावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून ही प्रकिया मंगळवार१६ जुलै २०१८ सायं ५ वाजेपर्यंत चालणार  आहे. या कालावधीत पडताळणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार विद्यार्थांना आता डिप्लोमा प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तरी याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिप्लोमा (पॉलिटेक्निक) प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र ९८६०१६०४३१९८९०५६६२८१ व टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी केले आहे. पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे व प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.  

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *