👁 5 Views

दुधाला_प्रति_लिटर_पाच_रुपये_निर्यात_अनुदान_देणार.. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन: #राज्यमंत्री_सदाभाऊ_खोत_यांची_माहिती

पंढरपूर LIVE 7 July 2018

महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि व्यवसाय अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त झालेल्या व निर्माण होत असलेल्या दूध पावडर निर्यातीवर प्रतिकिलो 50 रुपये व दुधास प्रति लिटर पाच रुपये निर्यात अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी दिली. नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सुरू असुन राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचेसह माजी मंत्री विनय कोरे ,राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागरभाऊ खोत यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
तसेच दुग्ध व्यवसाय टिकविण्यासाठी आणि दुग्ध उत्पादकांना दिलासा देण्याबाबत चर्चा केली यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अशी माहिती दिली-मुख्यमंत्री म्हणाले दुग्धव्यवसाय समोरील अडचणींवर सकारात्मक निर्णय घेण्याचा विचार सरकार करीत आहे. याबाबत दुग्ध विकास विभागाकडून अहवाल मागुन घेतला जाईल. दूध पावडर निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देणे, जे संघ दूध निर्यात करतील त्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान, शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश करणे, दुधाला अनुदान देणे, राज्यातच मार्केट मिळवून देणे,ज्या देशांना भारत मदत करतो त्या देशांना तसेच चीनला साखर दूध पावडर निर्यातीसाठी केंद्र शासनाकडे शिफारस करणे, आदी बाबींवर सकारात्मक विचार करून निर्णय विधिमंडळाच्या अधिवेशनात जाहीर केला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे राज्यमंत्री खोत यांनी सांगितले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *