👁 10 Views

दुचाकी – ट्रकच्या भीषण अपघातात तरूणीचा मृत्यू

 

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील नवीन दरी पुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला.


रिदा मुकादम (वय 24) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर नटराज अनिलकुमार (वय 30) हा जखमी झाला आहे.


याप्रकरणी नटराज यांच्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दोन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास घडला.

 नटराज व रिदा हे मित्र असून, दोघे दुचाकीवरून पुणे-सातारा रस्त्याने जात होते. दरी पूल येथे आल्यानंतर मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 


यात रिदा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनास्थळी न थांबता चालक पसार झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *