👁 6 Views

शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील चित्रफिती दाखवण्याचा प्रयत्न

 

राशिवडे : शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील एका माध्यमिक शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकानेच विद्यार्थिनींच्या असहायतेचा गैरफायदा घेत चुकीचे वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.


शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील चित्रफितीही दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेळेवाडीतील एका माध्यमिक शाळेमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने इयता 8 वी ते 10 च्या आठ ते दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. मुलींच्या खांद्यावर हात टाकणे, खिशात हात घालणे, असे किळसवाणे प्रकार या शिक्षकाने केले होते. तसेच अश्लील चित्रफितीही दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु, भीतीपोटी मुलींनी पालकांना याची माहिती दिली नाही.

याबाबतची कुणकुण लागल्यानंतर सरपंचांसह सदस्यांनी संबंधित संस्थाचालकांना भेटून या गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानंतर या शिक्षकाची सातारा जिल्ह्यात तत्काळ बदली करण्यात आली. यानंतर पीडित विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यासाठी सोमवारी गीता हसूरकर यांना या शाळेकडे पाठविण्यात आले. हसूरकर यांच्याशी बोलताना संबंधित विद्यार्थिनींनी आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला.


या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, यापूर्वीही या शिक्षकाने दुसर्‍या ठिकाणी असाच प्रकार केल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे त्याची शेळेवाडीस बदली करण्यात आली होती. संबंधित शिक्षकाची बदली न करता त्याला कायमचे निलंबित करावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *