👁 7 Views

सुप्रसिध्द पार्श्‍वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान

पंढरपूर LIVE 12 July 2018

मदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे. सदर सोहोळ्यास ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट मीडिया, तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिनिधी उपस्थित होते.

 पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात


अनुराधाजींनी आजवर ४५ वर्षे अनेक भारतीय भाषांमधील १५०० हून अधिक गाणी गाऊन भारतीय संगीतसृष्टीत मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर कारकीर्द निभावणाऱ्या अनुराधाजी आपल्या सुरमधूर स्वरांनी श्रोत्यांची मनं जिंकण्याबरोबरचं इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगताना म्हणतात की, “८०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या ब्रिटिश संसदेत पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी खूपच आनंददायी बाब असून आजवरच्या श्रोत्यांच्या वाढत्या प्रेमामुळेच हे सर्वकाही शक्य होऊ शकले आहे. आपण केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून त्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात असल्याची जणीव हा पुरस्कार स्वीकारताना होत आहे.”
सध्या, त्यांच्या जागतिक दौऱ्यांदरम्यान यूके आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन आल्या असून पुढे श्रीलंका आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा प्रवास करणार आहेत व त्याचबरोबर एक प्रमुख भक्ती प्रकल्पावर काम देखील सुरु आहे. 

  

शहीदांच्या कुटुंबांसाठी आणि गरीबांसाठी जीवनदायी कार्यांबद्दल विचारले असता अनुराधाजी म्हणतात की“हे केवळ मी समाजाचे काही देणे लागते म्हणून मनापासून केलेले कार्य आहे. त्याबद्दल जास्त काही मी बोलू इच्छित नाही. समाजाप्रती आपली जवाबदारी असून सामाजिक कार्याद्वारे समाजाची परतफेड करणे आपले कर्तव्य आहे असे मी मानते. “
प्रसंगोपात, अनुराधा पौडवाल देखील महाराष्ट्र च्या नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि वीज समस्या सोडविण्यासाठी सक्रिय असतात. व इतर अनेक इच्छुक लोकांनी देखील सदर उपक्रमांचे अनुसरण करणे आवश्यक आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *