👁 8 Views

पंढरपूर सिंहगडच्या १४ विद्यार्थ्यांची महाबळ इंडस्ट्रीजमध्ये निवड

पंढरपूर LIVE 12 July 2018


पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांची महाबळ इंडस्ट्रीज कंपनीत निवड असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. राजश्री बाडगेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सोमनाथ कोळीप्रा. अमित भादुले आदी.
शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण शिक्षणपध्दतीमुळे पंढरपूर सिंहगड ची प्लेसमेंट मध्ये दमदार वाटचाल
   लक्ष्मी दहिवडी (प्रतिनिधी ) जगभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनसाठी आघाडीच्या श्रेणीतील ऑटोमोबाईल घटक उत्पादनात अग्रेसर असणा-या महाबळ इंडस्ट्रीज-मिरज मधिल कंपनी मध्ये कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण शिक्षणपध्दतीमुळे पंढरपूर सिंहगड ची प्लेसमेंट मध्ये दमदार वाटचाल झाली असून महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


    एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शेवटच्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या ईजाज बागवानअर्जुन भोसलेओंकार देशमुखअमर गोडसेवसुधंरा गुरवअविराज कदमसमिर काटकरवैभव कुदळेआनंद मोरेशुभम पाटीलमनाली रंजुनअजित शिंदेसोनिका सिंगमनोजकुमार काशिद अशा एकूण १४ विद्यार्थ्यांची महाबळ इंडस्ट्रीज मध्ये कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड करण्यात आली आहे.
      सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकी शिक्षणाचा उत्तम दर्जा व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असलेले पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोक-या देऊन प्लेसमेंट मध्ये उतुंग झेप घेत आहे. एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडे कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण असल्यामुळे पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात निवड होत असल्यामुळे पालकांतून समाधान व्यक्त होत आहे. भारतात स्थापित महाबळ इन्फ्रा इंजिनियरिंग प्रा. लि. ही एक कंपनी असून ती एक विस्तृत अभियांत्रिकी कार्ये पार पाडण्यासाठी सुसज्ज आहे. या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
        महाबळ इंडस्ट्रीज मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *