👁 8 Views

आमदार निलमताई गोर्‍हे यांची लक्षवेधी… चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी “एकात्मिक विकास प्रकल्प” राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन!

पंढरपूर LIVE 13 July 2018 संग्रहीत छायाचित्र

पंढरीत येणार्‍या लाखो भाविकांचे तिर्थस्थान जिचा उल्लेख साधु संतांनी “माझी बहिण चंद्रभागा.. करीतसे पापभंगा” असा केलेला आहे. त्या चंद्रभागेच्या पात्रातील स्वच्छतेबाबत व तिचे पावित्रे जपण्याबाबत वारकरी सांप्रदायासह पंढरीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते वारंवार आवाज उठवतात. परंतु चंद्रभागेत मिसळणारे मैलामिश्रीत पाणी असो अथवा वाळवंटात भाविकांच्या स्नानासाठीची सोय असो हे प्रश्‍न जैसे थे! असल्याचे आढळुन येते.

संग्रहीत छायाचित्र

 आता चंद्रभागेच्या संदर्भातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या आमदार निलमताई गोर्‍हे यांनी स्वत:च पुढाकार घेतला असल्याचे दिसून आले. आ. निलमताई गोर्‍हे यांनी चंद्रभागेच्या स्वच्छतेसंदर्भात, भाविकांच्या स्नानगृहासंदर्भात व स्वच्छतागृहांसंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. “एकात्मिक विकास प्रकल्प” राबवुन हे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने आमदार निलमताईंच्या या लक्षवेधीची दखल शासनाने गंभीरपणे घेतल्याचे दिसून येते.
पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार “एकात्मिक विकास प्रकल्प” राबविणार आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

दक्षिणेची काशी म्हणून महाराष्ट्रातील पंढरपूर हे ओळखले जाते. वर्षभर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, आषाढी कार्तिकेला तर पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळते, त्यामुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडतो. चंद्रभागा नदीकडे भाविक एक श्रद्धास्थान म्हणून पाहतात. मात्र अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १६ मे, २०१८ पासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला व चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता भाविकांची अलोट गर्दी झाली असताना नदीच्या पात्रात मैलामिश्रित पाणी असल्याचे भाविकांना जाणवले होते, दुर्गंधीयुक्त व दुषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका तसेच तीरावर खड्डे खणले असल्यामुळे त्या खड्यामध्ये अनेक लहान मुले, महिला, पुरुष भाविक दगावण्याची शक्यता आहे. तसेच येथे निर्माल्य कुंड असावे तेही नाही. उजळणी तातडीने पाणी सोडून गोपाळपूर बंदरात या पाण्याचा साठा करण्यात यावा.  हे आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी आज सभागृहामध्ये यासबंधी लक्षवेधी मांडला.
संग्रहीत छायाचित्र
 यावेळी आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
१) सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ड्रेनेज क्षमता वाढविण्यासाठी लागणाऱ्या ६८ दशलक्ष निधी कधी देणार?
२) चंद्रभागेत वाळू उपशामुळे व पाणी साठविण्यासाठी खड्डे खणले जातात त्यामध्ये अनेक भाविक दगावले आहेत, त्या संबंधी काय उपाययोजना करणार?
३) महिलांना अंघोळीसाठी तयार केलेल्या स्नानगृहे उपलब्ध नाहीत आणि तात्पुरते उभारण्यात आलेले स्नानगृहे उडून गेले आहेत, त्यावर काय उपाययोजन करणार?
  
यावर राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की
“पंढरपूरमध्ये जेवढे सांडपाणी तयार होते त्या तुलनेत सांडपाण्याचा निचरा करणार प्रकल्प कार्यान्वित नाही. सध्या १५.५० एमएलडी सांडपाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आहे. मात्र सध्या ८ एमएलडी सांडपाण्याचा निचरा सध्या होतोय.  म्हणून २०४९ पर्यंत या शहराची सांडपाण्याचा निचरा होण्याची गरज लक्ष्यात घेता “एकात्मिक विकास प्रकल्प” राबविण्यात येणार आहे. यात ५९.७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यातुन ६६ किलोमीटर ची नवीन अंडरलाईन सांडपाणी नेणारी पाईपलाईन करण्यात येऊन या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात आणण्यात येणार आहे. तसेच भीमा व चंद्रभागा नद्यांमध्ये दौंड, शिरूर आणि बारामती ईंदापूर,,पुणें,पिंपरी चिंचवड या व इतर शहरातून दूषित पाणी नदीत सोडले जाते आहे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध योजने अंतर्गत निधी देण्यात आला आहे. तसेच पंढरपूर नगरपालिका आणि पंढरपूर देवस्थान समिती यांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून नदी पात्रातील  कचरा उचलण्यासाठी नेमली आहे.”
संग्रहीत छायाचित्र

▪खड्डे व स्नानगृहाच्या दुरावस्थेवर उत्तर देताना… त्यासाठी खाजगी एजन्सी नेमून त्याची व्यवस्था केली जाईल असे उत्तर दिले आहे. यामुळे विठलाच्या दर्शनासाठी व वारीत येणाऱ्या भाविकांसाठी ‘निर्मल वारीच्या’ माध्यमातून मोबाईल शौचालय व महिला,पुरुषांसाठी  स्नानाची योग्य सोय करण्यात आली आहे. हा एकात्मिक विकास प्रकल्प हा पुढील २४ महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले .लाखो वारकर्यांना दिलासा देणार्या या तपशीलवार ऊत्तराबाबत  यावेळी आ.डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *