👁 8 Views

दौंड तालुक्यातील विद्यार्थिनींना पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाऊंडेशन तर्फे 3000 सायकलींचे वाटप

पंढरपूर LIVE 13 July 2018

दौंड, 13 जुलै 2018: पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाऊंडेशनच्या वतीने आज दौंड तालुक्यातील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे विद्यार्थीनींना टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.आज एकूण 3000 सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त रामचंद्र व्यंकटरामन, टाटा ट्रस्टचे मुख्य वित्त अधिकारी आशिष ​​देशपांडे, मुंबईमधील प्रख्यात पॅथेलॉजिस्ट डॉक्टर डॉ.मोहमद अली पाटणकर, हिरो सायकल्सचे हेड ऑफ ऑपरेशन नीरज चंद्रा, नर्मदा बालघर चॅरिटेबल ट्रस्टचे भारत मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा प्रकारचे उपक्रम समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घेण्यात आले पाहिजे. पवार चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अशा उपक्रमांना सहकार्य करेल. विद्यार्थीनींनी या सायकलींचा वापर शैक्षणिक हेतूसाठी करून उज्वल भविष्य घडवावे. यामुळेच अशा प्रकारच्या उपक्रमांमागील उद्देश साध्य होईल. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक महत्वाचा उपक्रम असून मी या उपक्रमाचा एक भाग झाल्याने मला खूप आनंद होत आहे.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमामध्ये ग्रामीण विभागाचे शैक्षणिक व सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत असून दौंड व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन व सबलीकरणासाठी 15000 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम समाजाच्या विकासासाठी आम्ही असेच पुढे चालू ठेवू. या योजनेअंतर्गत माजी कृषी मंत्री शरद पवार यांचा पुणे जिल्ह्यात 15000सायकली वाटप करण्याचा मानस आहे. शाळा हि घरापासून दूर आहे, यामुळे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, हि भावना आहे. त्यामुळेच टू व्हील्स ऑफ होप या मोहिमेअंतर्गत आम्ही या सायकल वाटत आहे.


टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त रामचंद्र व्यंकटरामन,टाटा ट्रस्टचे मुख्य वित्त अधिकारी आशिष देशपांडे, मुंबईमधील प्रख्यात पॅथेलॉजीस्ट डॉक्टर डॉ.मोहमद अली पाटणकर, हिरो सायकल्सचे हेड ऑफ ऑपरेशन नीरज चंद्रा, नर्मदा बालघर चॅरिटेबल ट्रस्टचे भारत मेहता यांनी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.


  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *