👁 7 Views

लोकमंगल तर्फे कन्या प्रशालेत काव्य संमेलन उत्साहात साजरे

पंढरपूर LIVE 17 July 2018


कविता विद्यार्थ्यांनी अभ्यासापुरत्या मर्यादित न ठेवता जगण्यासाठी कराव्यात-सुनील जवंजाळ, सर
सांगोला/प्रतिनिधी : 
    आषाढ महिन्याचा पहिला दिवस कवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो. लोकमंगल पतसंस्थेतर्फे जेष्ठ मेघदूतकार महाकवी कालिदास यांच्या जयंती निमित्त काव्य संमेलनाचे आयोजन कन्या प्रशालेत करण्यात आले. 
    प्रारंभी प्रशालेत सरस्वतीचे प्रतिमापुजन कवी सुनील जवंजाळ(सर)यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थीनी प्रियांका कोळेकर, दीपाली पवार, स्नेहल गडदे, या विद्यार्थीनींनी कविता सादर केल्या. 
    या कार्यक्रमात कवी सुनील जवंजाळ यांनीही अनेक कविता सादर केल्या. आई, वडील, निसर्ग यांच्यावर आधारित विविध काव्य सादर केले. आई-वडील यांच्यावरिल काव्यास विद्यार्थी व शिक्षक भावनिक होवून काव्याचा आस्वाद घेत होते. तर काही काव्यास विद्यार्थ्यांनी अखंड टाळ्यांचा प्रतिसाद दिला. कवी सुनील जवंजाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा समाजसेवक दादासाो खडतरे, राजू मगर, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 
    प्रशालेतील विद्यार्थ्यांना लोकमंगलच्या वतीने प्रशस्तीपत्रक व बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुवर्णा इंगवले(मॅडम)यांनी केले. कवींचा सत्कार मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे(मॅडम)यांनी केला. कार्यक्रमास संस्था सचिव प्रा.निलकंठ शिंदे, दादासाहेब खडतरे, अतुल जगदाळे, उद्योजक राजू मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, लोकमंगल पतसंस्था यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोकमंगलचे अतुल जगदाळे व प्रतिक कळसे यांनी केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *