👁 9 Views

पंढरपूरातील स्वच्छता अभियानात चौदा टन कचरा गोळा सुमारे चार हजार अधिकारी कर्मचारी सहभागी

पंढरपूर LIVE 17 July 2018

पंढरपूर दि. 16 :- सोलापूर जिल्हा प्रशासनाने आज राबविलेल्या महास्वच्छता अभियानात 14 टन कचरा गोळा करण्यात आला. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या अभियानात सुमारे चार हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
पंढरपुरातील 65 एकर, मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी आणि नदीपात्रातील वाळवंट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र पथके करण्यात आली होती. तीन ट्रक, दोन ट्रॅक्टर व सुमारे 29 घंटा गाड्यांच्या साहाय्याने हा कचरा शहराबाहेर हलविण्यात आला.
महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी  डॉ. भोसले यांच्या हस्ते नामदेव पायरी येथे करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, तहलिसदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *