👁 8 Views

दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाला यश…! प्रति लिटर दुधावर मिळणार 5 रुपये अनुदान! खा. राजु शेट्टी सांगत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच- सचिन पाटील

पंढरपूर LIVE 19 July 2018

राज्यात मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या दूध आंदोलनाने उग्र रूप धारण केल्यानंतर सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रति लिटर 25 रुपये दर देण्याचे मान्य केले. त्यानुसार येत्या 21 जुलैपासून दूध उत्पादकांना हा दर मिळेल, अशी घोषणा दुग्धविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी विधानपरिषदेत केली.

खा. राजु शेट्टी सांगत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच- सचिन पाटील

दरम्यान याबाबत पंढरपूर लाईव्हने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की, हे सरकार फसवे आहे, आश्‍वासनं दिल्याशिवाय या सरकारने आजपर्यंत या सरकारने काहीही केलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजु शेट्टी जोपर्यंत याबाबत सविस्तर माहिती घेत नाहीत व माध्यमांसमोर येऊन शासनाचा निर्णय योग्य आहे. दुधउत्पादकांना न्याय मिळालाय असे सांगत नाहीत. तोपर्यंत आमचे आंदोलन चालुच राहील. अशी भुमिका स्पष्ट केली. 

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

दुधावरील हे अनुदान सहकारी, खासगी दूधप्रक्रिया संस्था, दूध पुरवठा संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना २५ रूपये प्रति लिटर दर दिला तर, हे अनुदान मिळणार आहे. सरकारच्या आजच्या निर्णयामुळे शनिवारपासून राज्यातील दूध उत्पादक संघाला या अनुदानासाठी आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना २५ रूपये प्रति लिटरचा दर द्यावा लागणार आहे.

राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पेटल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मागील ३ दिवसांपासून विधीमंडळात उमटले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी राज्यातील दूध सहकारी आणि खासगी दूध प्रक्रिया संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक विधानभवनात झाली. यात दूध उत्पादकांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या दूध खरेदी दराबाबत निर्णय घेण्यात आले. यात राज्यातील खासगी आणि सहकारी दूध प्रक्रिया संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवी बंद दुधासाठी कोणतेही अनुदान देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. तर पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य सरकारकडून प्रतिलिटर ५ रूपये प्रमाणे अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णयही घेण्यात आला. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था तसेच प्रक्रिया करणारी संस्था यापैकी एकाला लागू राहणार आहे. तसेच दूध भुकटी उत्पादकांना प्रतिलिटर ५ रूपये प्रमाणेही अनुदान देण्यात येईल. मात्र, यात त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

विधानभवन परिसरात झालेल्या बैठकीतील निर्णयाला सर्व सहकारी, खासगी दूध उत्पादक, दूध प्रक्रिया, पूरवठा करणाऱ्या संस्थांनीही एकमताने सहमती दर्शवली असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी विधानपरिषदेत दिली.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *