👁 8 Views

… आणि पंढरपूरच्या बसस्थानकासमोरील तळ्यात सोडले मासे! स्वाभिमानी चे आगळे आंदोलन!!

पंढरपूर LIVE 20 July 2018


पंढरपूर येथील कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेले हायटेक नविन बसस्थानकाचे समोर सर्वत्र चिखलाचे आणि पाणी साठलेल्या  खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले चित्र गेल्या कित्येक वर्षापासूनचे आहे. दर पावसाळ्यात हे चित्र म्हणजेच पंढरपूरचे बसस्थानकाचे फलाट! अशी व्याख्या केली जातेय. आज या बसस्थानकावरच्या अवस्थेच्या निषेधार्ह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील साठलेल्या पाण्यात चक्क मासे सोडून अनोखे आंदोलन केले.

 पंढरपूर येथे पंढरपूर बस स्थानकात खड्डे पडल्यामुळे स्थानकाला चक्क तलावाचे स्वरूप आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी साचलेल्या पाण्यात मासे सोडून आंदोलन केले व व्यवस्थापन कार्यालयात बोंब मारून बस व्यवस्थापणाचा निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष अरुण आसबे , शहराध्यक्ष सुधीर भोसले, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे श्रीकांत शिंदे , डॉक्टर सेल चे जिल्हाध्यक्ष डॉ अमरजीत  गोडसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *