👁 8 Views

मारहाण प्रकरणी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको

पंढरपूर LIVE 20 July 2018


    पोलिसांकडून बळाचा वापर करुन दोघांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबनाची मागणी करत शेतकरी संघटनेने कुर्डूवाडी रस्त्यावरी शेंदरी भोईंजे फाट्यावर शुक्रवारी रास्तारोकाे आंदोलन केले.यावेळी शेतकरी संघटनेचे युवक राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड, तालुकाध्यक्ष हनुमंत भोसले, रयत क्रांती संघटनेचे अजिनाथ परबत, प्रहार संघटनेचे आण्णा जाधव, बापू सावंत, स्वाभीमानी संघटनेचे शिवाजी पाटील, महावीर सावळे, सतीश गायकवाड, बापू गायकवाड, मच्छिंद्र बोरकर, हर्षद निंबाळकर, संपत अंधारे, प्यारेलाल मुसळे, विलास कवठे, किसन राउत, भिमराव कवठे, भिमराव उमाटे, अर्जुन खंडागळे, रविंद्र मुठाळ, दत्तू उमाटे, बापूराव देशमुख, अनंत शिर्के, सौदागर निकम, अमोल गवळी, शिवाजी निकम, नटराज मुळे, जोतीराम निकम, मुस्सा मुलाणी, सुधीर निकम यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    बार्शी तालुक्यात मंगळवारी दिनांक १७ जलै रोजी काही आंदोलकांनी कुर्डूवाडी बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे दुध वाहतुकीचे वाहन तोडफोड केले आणि दुध पिशव्या रस्त्यावर फेकल्या, त्यानंतर ते आंदोलक पळून गेले. त्यातील आंदोलक पोलिसांना सापडले नसल्याने खांडवी आऊटपोस्टचे पोलिस हवालदार सचिन सुर्यकांत माने व इतर सहकाऱ्यांनी राजकीय पंडिताच्या सांगण्यावरुन भोईजे गावातील शेतकच्यांची मुले सचिन लक्ष्मण निकम व भिमराव गोरख उमाटे या मुलांना अमानुषपणे मारहान करुन बेदम गंभीर जखमी केले. या प्रकाराच्या मारहाणीत सचिन याचा कानाचा पडदा तुटलेला असून सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे त्याचेवर उपचार सुरू आहेत. हवालदार माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या तालीबाणी कृत्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *