👁 8 Views

सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं चक्काजाम ; अनेक एसटी बसेस फोडल्या !

पंढरपूर LIVE 21 July 2018


सोलापूर – मराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.

मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरु झालेली पूर्वीची सर्व आंदोलन ही शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय मार्गाने पार पडली होती. परंतु सध्या मराठा क्रांती मोर्चाची आंदोलनं ही हिंसक वळणावर जाऊ लागल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरात सुरु झालेल्या चक्काजामला हिंसक वळण लागताच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरु केले. तेव्हा आक्रमक आंदोलनकर्त्यानी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी २ एसटी बसेसची तोडफोड केल्याने, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या फोटोवर अंडी फेकल्याने या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही आक्रमक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *