👁 9 Views

आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी दररोज आठ हजार लिटर आर.ओ. युक्त पाण्याचे वाटप

पंढरपूर LIVE 21 July 2018

पंढरपूरः-(संतोष हलकुडे) दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या व दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. या उपक्रमात श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित चारही महाविद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
        पंढरपूरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या दर्शन रांगेतील तहानेने व्याकूळ झालेल्या हजारो वारकऱ्यांची तहान भागविण्याच्या विडा स्वेरी या शैक्षणिक संस्थेमार्फत गेल्या २० वर्षापासून उचलला असून यंदाही पंरपरेप्रमाणे येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम २१ जुलै २०१८ पासून सुरु झाला आहे.प्रारंभी दर्शन रांगेत उभे असलेले  वारकरी मच्छिंद्र कांबळे (रा. गेवराई जि.बीड) यांना आर.ओ. युक्त पाणी देवून या पाणी वाटप करून उदघाटन करण्यात आले. पाणी वाटप प्रसंगी श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ. एन.बी.पवार, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, समन्वयक प्रा. सुनील भिंगारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आर.एन. हरिदास, प्रा. एस.एम.शिंदे, प्रा. मिटकल, विविध विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थीप्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रिध्दी-सिध्दी मंदिरापासून गोपाळपूरपर्यंत व पुढे कॉलेज रोड मार्गात विद्यार्थी प्रचंड उत्साहाने आर.ओ. युक्त शुध्द पाण्याचे वाटप करत होते. नवमी, दशमी व एकादशी या तीन दिवशी तहानलेल्या वारकऱ्यांना आर.ओ. युक्त शुध्द पाण्याचे वाटप करण्यात येते. विद्यार्थी हे ग्लास, वॉटर जगवॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवत होते. दररोज साधारण सात ते आठ हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्रा. सुनील भिंगारे यांनी या पाणी वाटपाचे नियोजन उत्तम प्रकारे करत आहेत. त्यांच्या समवेत डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्रा. शरद कावळे, प्रा.ए..एस. भातलवंडे, प्रा. अवधूत भिसे असे जवळपास ५० प्राध्यापक वर्ग देखील कार्यरत आहेत
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *