👁 6 Views

अखेर मुख्यमंत्र्यांना महापुजेचा मान स्विकारता आलाच नाही… हिंगोली जिल्ह्यातील जाधव परिवाराला मिळणार महापुजेचा सर्वोच्च मान? मानाचे वारकरी दांपत्य करणार श्रीविठ्ठलाची महापुजा- गिरीष महाजन ‘‘आषाढी वारीत गाजतोय भारी – मराठा ठोक मोर्चा’’

पंढरपूर LIVE 22 July 2018


कधी नव्हे ती ही आषाढी वारी एका आगळ्या वेगळ्या कारणामुळे गाजतेय. मराठा क्रांती ठोक मोर्चा व त्यांची आंदोलने हा मुद्दा विशेषकरुन गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचे कोणतेही प्रश्‍न सोडविलेले नाहीत. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचेही प्रश्‍न सोडविण्यात ते अपयशी ठरलेत त्यामुळे त्यांना गोरगरीबांचं महाराष्ट्राचं आराध्ये दैवत असलेल्या पांडुरंगाची महापुजा करण्याचा कोणताही अधिकार नाही. या आषाढी वारीला श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोणत्याही परिस्थितीत होऊ नाही. अशी भुमिका मराठा ठोक क्रांती  मोर्चानं घेतल्यामुळं मुख्यमंत्र्यांना या वारीत महापुजेला येणार नसल्याचा निर्णय जाहीर करावा लागला. आणि आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापुजेचा मान मिळाला नाही तर.. हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव येथील सौ. वर्षा अनिल जाधव आणि श्री.अनिल गंगाधर जाधव या दांपत्त्याला श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची थेट महापुजा स्वहस्ते करण्याचा सर्वोच्च बहुमान मिळणार असल्याची माहिती मिळतेय.
भुवैकुंठ पंढरी नगरीत यावर्षी आषाढी एकादशीच्या महापुजेला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये. अशी भुमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतल्यामुळे व एकंदरीतच ही वारी शांततेत व सुरळीत पार पडावी या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या महापुजेला येणार नाहीत. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशीची श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेची महापुजा ही मानाच्या वारकरी दांपत्याच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती.  मुख्यमंत्री महापुजेला गनिमीकाव्याने येणार या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला असून हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव येथील सौ. वर्षा अनिल जाधव आणि श्री.अनिल गंगाधर जाधव या दांपत्त्याला श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची थेट महापुजा स्वहस्ते करण्याचा सर्वोच्च बहुमान आज मिळणार असल्याची माहिती मिळतेय. परंतु याबाबत अधिकृत माहिती पंढरपूर लाईव्हला हे वृत्त प्रसिध्द करतेपर्यंत मिळालेली नव्हती.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *