आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 23 July 2018
आज आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या विश्वाचे दैवत श्रीविठोबा रखुमाईची महापुजा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. आषाढी एकादशी निमित्तच्या महापुजेचा सर्वोच्च सन्मान अनिल गंगाधर जाधव (वय ३७) आणि सौ. वर्षा अनिल जाधव ( वय ३५) या दांपत्याला मिळाला आहे. हिंगोली तालुक्यातील भगवंती कडोळी ( ता. शेणगाव) येथील हे वारकरी आहेत. आज आषाढी एकादशी चा भव्य दिव्य सोहळा भुवैकुंठ पंढरी नगरीत साजरा होत असून रात्रभर हरिनामाचा जागर झाला आहे. टाळ-मृदंगाच्या व विठुनामाच्या जयघोषाने भिवरा तीर दुमदुमून गेला आहे.
महापुजेचा मान मिळालेले जाधव दांपत्य गेल्या चार वर्षापासून पायी वारी करतात. दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या या दांपत्याला मुलगा आणि दोन मुली असून शेतकरी असलेले जाधव दांपत्य विठ्ठलाची वारी मनोभावे करत आले आहेत.
यंदाचे मानाचे वारकरी दरवर्षी पेक्षा अधिक भाग्यवान आहेत. कारण दरवर्षी मानाच्या वारकऱ्यांना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळत असला तरी प्रत्यक्ष पूजेचे सर्व विधी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते होत असते. मात्र यंदा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पूजेपासून अडवून धरल्याने मुख्यमंत्री पूजेला आले नाहीत. मात्र ही पूजा एका सामान्य वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येइल अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. त्यामुळे यंदा या मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पूजेचे सर्व विधी संपन्न झाले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पालकमंत्री विजय देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, सदस्य संभाजी शिंदे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
असे शोधले जातात मानाचे वारकरी
शासकीय पूजा सुरु होण्याच्या सुमारे दोन तास आधीच दर्शन मंडपाचे मुख्य प्रवेश व्दार बंद केले जाते. मंडपातून मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये जे माळकरी भाविक आहेत. ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे. जे सहकुटुंब पायी वारी करतात असे भाविक पुकारले जातात. मंदिराच्या अतिशय जवळ आलेल्या अशा भाविक दांपत्याला महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com