आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 24 July 2018
मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या आंदोलनाने संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरुप धारण केलेले असून आज दुपारी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे दोन एस.टी. बस फोडल्या आहेत.
पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन (पुर्व) यांचेकडून समजलेल्या माहितीनुसार आज दि. 24 जुलै 2018 रोजी दुपारी (एम.एच. 14 बी.टी. 38 51) व (एम. एच. 40 ए.क्यू. 6299) या क्रमांकाच्या या दोन्ही गाड्या जुन्या अकलुज मार्गाने वाहतुक वळवल्यामुळे पिराची कुरोली येथून जात होत्या. यावेळी पिराची कुरोली येथे मराठा आरक्षणाच्या मागणी साठी आंदोलन चालु होते. यावेळी आंदोलकांनी दोन एस.टी. बस अडवल्या. दोन्ही गाड्यातील प्रवाशांना खाली उतरवले व दगडफेक करुन या दोन्ही एस.टी. बस फोडल्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने संबंध महाराष्ट्रातील व जगातील कांही देशातील सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मुक मोर्चा आंदोलन केले होते. या मुक मोर्चाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली होती. परंतु एवढे मुक मोर्चे निघूनही मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालेले नाही त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आता संपुर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती ठोक मोर्चा चे आंदोलन सुरु केले आहे. काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली होती. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद हाक दिली होती. आज आषाढी वारीमुळे पंढरपूर शहर वगळता तालुक्यातील अनेक गावात कडकडीत बंद असलेला आढळून आला. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे मराठा समाजातील बांधव व ग्रामस्थानी एकत्र येत काकासाहेब शिंदे या युवकाला श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर ग्रामस्थाच्या अवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला. जोपर्यंत मराठा क्रांती मोर्चातील मागण्या शासन मान्य करीत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र हे आंदोलन चांगलेच पेटलेले असून सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com