👁 5 Views

बसचा टायर फुटला अन् घात झाला : पोलिस कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

 

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नितीन दिलीप शिंदे (वय 36वर्ष) असे अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीसाचे नाव आहे 


आपला सहकारी अपघातात गमावल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव येथे हा अपघात झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हे सोलापूरहून पुण्याकडे निघाले होते. यावेळी ते ज्या बसमधून प्रवास करत होते त्या बसचा अचानक टायर फुटला आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. 


या भीषण अपघातात शिंदे यांच्यासह इतर चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिंदे हे कुटुंबातील कर्ते होते त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि संस्कृती व गिरीजा या मुली असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *