👁 8 Views

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करावे महसूल दिनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे प्रतिपादन

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

सोलापूर दि. 2 :-   लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियमांचा अभ्यास करुन पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात केले.
एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त काल रंगभवन येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त  जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, उपविभागीय अधिकारी,. एम. बी. बोरकर, ज्योती पाटील, शमा पावर-ढोक, शिवाजी जगताप, प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी  सर्व तालुक्यांचे  तहसिलदार व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले,  शासकीय कामकाजाचे स्वरुप बदलत चालले आहे. महसूल विभाग हा शासनाचा महत्वाचा विभाग आहे. बदलत्या परिस्थितीनुसार नवीन नियम, लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी  विभागाने सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करणे गरजेचे आहे. इतरांपेक्षा चांगले काम करण्यापेक्षा इतरांचे चांगले काम करण्याची भूमिका महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठेवावी.’
शासन यंत्रणेतील महसूल विभाग महत्वाचा असून हा विभाग सर्वच शासकीय विभागाबरोबरच समन्वयाने काम करतो.  याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानात केलेले उल्लेखनीय काम आहे.  जलयुक्तच्या कामामध्ये जिल्ह्याने राज्यस्तरावर आपला वेगळा ठसा उमठविला असल्याचे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी यावेळी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे , अतिरिक्त  जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी महसूल दिनाचा सर्वांना शुभेच्छा दिल्या.  निवासी उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी  प्रास्ताविक केले.
कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, आषाढी वारी 2018 मध्ये उत्कृष्ठ  काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आणि महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इयत्ता 10 वी 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
000000
                                                                     ध्वज संहितेचे पालन
 करण्याचे आवाहन                     
            सोलापूर दि. 2 :-  केंद्र शासनाच्या निर्देशानूसार राष्ट्र्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास, प्लॅस्टिकच्या ध्वज निर्मितीस व विक्रीस मान्यता नाही, त्यामुळे ध्वजसंहितेच्या नियमांचे जिल्ह्यातील जनतेने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
स्वातंत्रय दिनानिमित्त  विद्यार्थी व नागरीकांकडून कागदाच्या तसेच  प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांचा वापर होऊ नये, ध्वजारोहणानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरस्त्र: पडून पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्टध्वजाचा अवमान अथवा विटंबना हे बोधचिन्ह व नांवे अधिनियम (अनुचित वापरास प्रतिबंध) 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार दंडनीय अपराध आहे.  राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नये, राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतूदीनूसार नष्ट करणे आवश्यक असल्याचेही डॉ. भोसले यांनी कळविले आहे.
           00000
परिवहनच्या कामासाठी
शिबिरांचे आयोजन
सोलापूर दि.2 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील कामकाज गतीने व्हावे व लोकांना त्वरीत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अकलूज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिक्षेत्रात ऑगस्ट मध्ये शिबिरे आयोजीत करण्यात आली आहेत.
सांगोला येथे दिनांक 7, 8 आणि 21 ऑगस्ट,  करमाळ्यात दिनांक 9, 10  आणि 28 ऑग्स्ट, टेंभूर्णीमध्ये दिनांक 3, 23 आणि 24 ऑगस्ट, माढा,येथे 14 ऑगस्ट  तर कुर्डूवाडी येथे दिनांक 16 व 29 ऑगस्ट 2018 रोजी शिबिरे आयोजीत केली आहेत. ही सर्व शिबिरे संबधित ठिकाणच्या शासकीय विश्रामगृह येथे होतील. या शिबिराचा संब‍धित तालुक्यातील लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप पा्रदेशीक परिवहन अधिकारी, अकलुज यांनी केले आहे.
000000
                                                                         प्रधानमंत्री कृषी सिंचनसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दि. 2 :-  प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत जिल्ह्यातील एक हजार 781 शेतकऱ्यांनी पूर्व संमतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
ठिंबक व तुषार सिंचन करू इच्छणाऱ्या  प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2018 मध्ये संच बसविणे करीता शासन मान्यता मिळाली आहे. अवर्षण प्रवण क्षेत्र व व अवर्षण्‍ प्रवण क्षेत्राबाहेरील तालुके यांचे विहीत मापदंडानुसार अनुदान देय आहे. त्याकरीता ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावयाचे आहेत. प्रस्ताव सादर करताना अर्जासोबत शेतकऱ्यानी केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत, पूर्व संमती पत्र, पीक क्षेत्र नोंद असलेल्या 7/12 उतारा,    अ उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, आधार लिंक राष्ट्रीयकृत बॅक खात्याचा पासबुक झेरॉक्स, कंपनी प्रतीनिधी तयार केलेल्या सुक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र आणि भौगोलिक स्थानांकन  पध्दतीने लाभार्थी संदर्भातील शेतकरी प्रतीनिधी समवेत संचाचे अक्षांश व रेखांशसह फोटो, बिलाची मूळ प्रत, शेतकऱ्याचे हमी पत्र  इतर अनुषंगीक कागदपत्रे पुरावे इ. तालुका कृ‍षि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. ऑनलाइन अर्जसादर केल्यानंतर पुर्व संमती तालूका स्तरावरून ऑनलाइन पध्दतीने देण्यात येईल. पुर्वसंमती मिळालेनंतर शेतकऱ्यांनी एका महिन्याच्या आत शासन मान्यता असलेल्या कंपनीकडून संच बसवून घ्यावा. या संचाची  मोका तपासणी कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करुन घेऊन अनुदानासाठी मागणी करावी, असे श्री. बिराजदार यांनी कळविले आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *