👁 9 Views

पंढरीत शासनाचा निषेध करीत 495 जणांनी केले मुंडन… मुंडन करुन पंढरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली अंत्ययात्रा…शासनाचा केला तिसरा…सकल मराठा समाजाचे आंदोलन..!

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

 फडणवीस सरकारचा निषेध करत आज सकल मराठा क्रांती मोर्चातील 495 जणांनी आज पंढरीतील शिवतिर्थावर मुंडन केले. आरक्षणासाठी मराठा समाजाने सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असुन येत्या 8 तारखे पर्यंत सरकारने या बाबत निर्णय घ्यावा विठ्ठलाने हा निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुध्दी द्यावी अशी प्रार्थना करून आज शिवाजी चौकात मराठा समाजातील बांधवांनी मुंडण आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयाञा काढून शासनाचा तिव्र शब्दात निषेध केला. या आंदोलनात मराठा समाज बांधवाचे तरुण मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.

बघा संपुर्ण व्हिडीओ बातमी.. पंढरपूर लाईव्ह वर!




 मराठा समाज क्रांती मोर्चा पंढरपूरचे प्रवक्ते मोहन अनपट यांनी फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली. मराठा समाजास आरक्षण मिळविण्यासाठी सन 2016 पासुन 57 मोर्चा काढून लोकशाही मार्गाने आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु गेल्या दोन वर्षांत या आरक्षण मागणीवर न्यायालयास मराठा आरक्षणा बाबत राज्य सरकारला म्हणणे द्या म्हणण्याची वेळ आली या मुळेच मराठा आरक्षण बाबतच्या दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांना आषाढी पुजेस रोखल्यापासुन सुरू असलेले हे आंदोलन हिंसक होऊ न देण्याचे काम सकल मराठा समाज जबाबदारीने करत असल्याची माहिती मोहन अनपट यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *