👁 8 Views

मराठा आरक्षणासाठी राज्यपाल व मुख्यमंत्री व खा.उदयनराजेंना भेटणार: सौ.साधनाताई भोसले

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018

पंढरपूर: मराठा आरक्षणासाठी सरकार वेळकाढु धोरण अवलंबीत असल्याबद्दल मराठा समाजात संतापाची भावना असून राज्यभर आंदोलन चालु आहे. मराठा आंदोलनाचा प्रारंभ पंढरपुरातून झाला असून पंढरपूर हे आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरले आहे. अशा परिस्थीतीत पंढरपूर शहराची प्रथम नागरीक व मराठा समाजाची एक घटक म्हणून आपण राज्याचे मुख्यमंत्री तसेच समन्वय गटाचे प्रमुख खा.उदयनराजे भोसले यांना भेटून लवकरात लवकर मराठा आरक्षण लागु करण्याची मागणी करणार असल्याचे पंढरपुरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी सांगितले.

सध्या राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालु असून संतापलेल्या मराठा समाजाने अदयाप संयम बाळगला आहे. तरिही समाजातील काही युवकांच्या भावना संतप्त झाल्याने आत्महत्याही झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला या घटना लाजीरवाण्या आहेत. तसेच काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे  व विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करणे साठी सहकार्य करणे आवश्यक आहे.
गेले काही दिवसापासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन चालु असून हे आंदोलन शांततेत चालु आहे. या आंदोलनास सर्व समाजाने पाठींबा दिला असून त्यांचे आभार मानले पाहीजेत. मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेवून जाणारा समाज असून या समाजाचा प्रश्न व समस्या सर्व समाजाच्या आहेत. आज पर्यत समाजाने जसे शांततेत व संयमाने आंदोलन केले तशाच पध्दतीने उदया दिनांक 9 ऑगस्ट रोजी होणारे चक्का जाम आंदोलनही शांततेत पार पाडावे, एस टी बस वर दगडफेक अशा हिंसक घटना हावु नयेत याची दक्षता घ्यावी व समाजाची चांगली प्रतिमा कायम ठेवावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांनी केले आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *