👁 10 Views

पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील बळीराजा चिंताग्रस्त… पावसानं ओढ दिल्यामुळं उभी पिकं मान टाकताहेत….

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018





परळी वैजनाथ (महादेव गिते) :- मराठवाड्याला पावसाने ओढ दिल्यामुळे उभी पिके मान टाकून सुकून जाताना दिसत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. परळी तालुक्यातील व परिसरात सुरुवातीला पाऊस चांगला पडल्यामुळे पण पुन्हा पाऊसाने मोठी उघाड दिल्यामुळे शेतकर्‍यांचे हातात आले पिक सुकु लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 


 गेल्या महिन्यापासून पाऊसाचा थेंब पडला नाही. सोयबीनसह इतर पिकांनी माना टाकल्याचे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कापसावरही बोंडअळी पडली आहे. शेतकर्‍यांना बँके कडून तसेच हात उसणे पैसे उचलून पेरणी केली होती. आता  पिकांनी माना टाकल्यामुळे आलेले पिक उपटून टाकायची वेळ आली आहे. पाऊस नाही पडलातर पुढील रब्बी हंगामातील पेरणी देखील शेतकर्‍यांना करणे आवघड आहे. अशी परिस्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण होऊ शकते. शासन ही शेतकर्यांसाठी ठोस निर्णय घेत नसल्यामुळें शेतकरी दुद मनस्थती मध्ये पडला आहे. शेतकर्यांना जगावे की, मरावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाचे कुठलेच अनुदान वेळेवर मिळत नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो त्या शेतकर्यांकडे शासन दरबारी कोणाच निर्णय घेतला जात नाही. शेतकर्यांचा फक्त मतदानापुर्ताच उपयोग केला जातो असा सुर देखील निघत आहेत. बळीराजाच्या मुलांना देखील शेतीला जोडधंदा उभारण्यासाठी बँका कर्ज देत नाहीत. अन् अधिकारी देखील उडावाउडवीचे उत्तर देत असतात. निसर्गाने पण शेतकर्यांना साथ नाही दिलीतर शेतकर्यांवर आत्महत्या करण्याशिवाय प्रर्याय नाही.  परळी तालुक्यातील व आजुबाजुच्या परिसरात  चार दिवसात जर पाऊस नाही पडला तर हातची आले पीके वाया गेल्या शिवाय राहणार नाहीत. परिसरात सध्यातर दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी माहिती भागवत माणिकराव मुंडे शेतकरी, तळेगाव,ता.परळी वैजनाथ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *