पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट 2018
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील उद्यानाच्या नावाबाबतचा वाद…
राजकीय द्वेषापोटी ईश्वरवठार गावच्या विकासात अडथळा- सुभाष माने
दलाली खाणार्या माणसांचा उपोषणाचा स्टंट! असे म्हणत सुभाष माने यांनी माऊली हळनवर यांच्यावर सणसणीत आरोप केला आहे. उपोषणाला बसलेले हळनवर व त्यांच्यासोबतच्यांवर अनेक केसेस आहेत. ते क्राईमचे लोक आहेत. असा आरोप करत उद्यानाला दिलेले नांव हे कायदेशिर असल्याचे त्यांनी सांगितले. तर माऊली हळनवर यांच्या मते हे नांव बेकायदेशिररित्या दिले गेले आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार उद्यानाच्याच्या नावाबाबतचा वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुक व जि.प. निवडणुकीत पराभुत झालेले माऊली हळनवर हे राजकीय द्वेषापोटी गावच्या सरपंच सौ. सितादेवी सुभाष माने या महिला सरपंचांना त्रास देऊन विकास कामात अडथळा आणत आहेत. उद्यानाला नाव दिलेले कायदेशीर नाही म्हणत उपोषण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन ईश्वर वठार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिल्याची माहिती सुभाष माने यांनी दिली आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळनवर व कांही ग्रामस्थांनी गावातील एका उद्यानाला सरपंचांनी आपल्या सासुचे नांव दिले ते कायदेशीर नसल्याचा आरोप करुन काल पंचायत समितीसमोर उपोषण सुरु केले होते. तर आज हळनवर व त्यांच्यासोबत उपोषणाला बसणारे हे राजकीय द्वेषापोटी हे करत असल्याचा आरोप त्यांच्यावर सुभाष माने यांनी केला आहे.
ईश्वर वठार येथील एका उद्यानाला सरपंचांनी आपल्या सासुचे नांव दिल्यासंबंधी पंचायत समितीसमोर उपोषणास बसणारांचे उपोषण हे राजकीय द्वेषापोटी असून आम्ही स्वखर्चाने रुपये पाच लाख खर्चून बांधलेल्या गावच्या प्रवेशद्वाराला महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नांव देण्याचा ठराव ग्रामसभेने मंजुर केला आहे. तसेच यशवंत ग्रामसमृध्दी योजनेतून बांधलेल्या सभागृहालाही महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नांव देण्यात आले आहे. मातोश्री सरुबाई माने या आमच्या गावातील आदरणीय दिवंगत महिला आहेत. त्या आदर्श माता म्हणून लोकमान्य होत्या. त्यांचे नांव गावातील छोट्याशा उद्यानाला द्यावे अशी मागणी बहुसंख्य ग्रामस्थांची मागणी ग्रामपंचायतीकडे आली. तेंव्हा दि. 30-4-2018 च्या ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये यावर विचार विनिमय होवुन हा ठराव सर्वानुमते मंजुर झाला आहे. तच्चयानुसार सदर उद्यानाला मातोश्री सरुबाई माने उद्यान असे नाव देण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिनियमाला अधीन राहून हे नाव दिले आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या अधिकारात हस्तक्षेप करुन केवळ प्रसिध्दीकरता उपोषणास बसण्याचा स्टंट कांही लोकांनी केला आहे. जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंचांना त्रास देऊन नैराश्यपोटी विकास कामात अडथळा आणतात व बेकायदेशीर वर्तन करतात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे ईश्वर वठार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केल्याची माहिती सुभाष माने यांनी दिली आहे.
ईश्वर वठार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ग्रामपंचायतीचा ठराव न घेता गावातील एका उद्यानाला आपल्या सासुचे नांव दिले ते कायदेशीर नसल्याने ते रद्द करुन या उद्यानास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नांव द्यावे या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळनवर हे पंढरपूर पंचायत समितीसमोर काल कांही ग्रामस्थांसह उपोषणास बसले आहेत. या पार्श्वभुमीवर आज ईश्वर वठार ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आज हे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com