👁 6 Views

मोहोळ : कालवा फुटून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाळराजे पाटलांनी केली पाहणी

 मगरवाडी प्रतिनिधी

पाटकूल- (ता.मोहोळ) येथे फुटलेल्या उजनी डावा कालव्याची आमदार मा यशवंत (तात्या) माने व लोकनेते शुगर चे चेअरमन मा बाळराजे पाटील यांनी प्रत्यक्षात भेट देवून कालवा दुरूस्तीचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.


त्वरित कालव्याचे काम पूर्ण करा तसेच नजरचुकीने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत अशा सूचना जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


यावेळी रा. कॉ. तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,नानासाहेब डोंगरे, सरपंच शिवाजीराव भोसले, सुनील सातपुते,भारत (भाऊ) सुतकर,माऊली चव्हाण,राजाराम आढेगावकर सर संजय शिंदे,रामदास चवरे, विकास कोकाटे,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश


 वाडकर,नायब तहसीलदार भालचंद्र यादव,गटविकास अधिकारी आनंद मिरगणे,तलाठी सौ तस्लीम बागवान सह शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *