पंढरपूर LIVE 14 ऑक्टोबर 2018
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज मंत्रालय परिसर आणि मंत्रालय विस्तारित इमारतीची पाहणी करून संपूर्ण परिसर, मंत्रालयातील कॉरिडॉर स्वच्छ ठेवतानाच स्वछतागृहांच्या साफसफाईवर देखील भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच अभ्यागतांसाठी मंत्रालयात प्रवेश सुलभ होण्याकरिता गार्डन गेट भागात अधिक पास काऊंटर सुरू करणे एक्स-रे मशिनची संख्या वाढविणे आणि मंत्रालयातील पार्किंग संदर्भात पर्यायी व्यवस्था तयार करणे याबाबत मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांचा प्रवेश अधिक सुलभ होण्यासाठीही यावेळी मुख्य सचिवांनी चर्चा केली. मंत्रालयात प्रवेश देण्यापूर्वी अभ्यागत गार्डन मध्ये येतील तेथे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर त्यांना प्रवेशाचा पास मिळेल ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी पास काऊंटर वाढवावेत, तपासणी एक्सरे मशीनची संख्या वाढविल्यास नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही, यादृष्टीने कार्यवाहिच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयातील पार्किंगबाबतही यावेळी चर्चा झाली आणि त्यासाठी काही पर्यायांचा विचार सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी सचिवांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या कार्यालयाची स्वछता केली. यावेळी मंत्रालयात स्वच्छतेसाठी विशेषतः धूळ साफ करण्यासाठी हाताने चालविण्यात येणाऱ्या साधनांची पाहणी मुख्य सचिवांनी केली. मंत्रालय परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्य सचिवांनी विस्तारित इमारतीचीही पाहणी केली. विस्तारित इमारतीचा तळमजला, टपाल कार्यालयाचा परिसर,अभिलेख कक्ष, पहिल्या मजल्यावरील आदिवासी विभागाचे कार्यालय, रोटा प्रिंटिंग प्रेसचा भाग त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची देखील पाहणी मुख्य सचिव यांनी केली. मंत्रालयाच्या आवारात पडून असलेल्या सामानाबाबत दर आठवड्याच्या शेवटी आढावा घेऊन पडीक साहित्य हटविण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







