पंढरपूर LIVE 14 ऑक्टोबर 2018
भारतातुन सर्वाधिक नोंदणी झालेले रिमोट सेन्टर पंढरपूर सिंहगड
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी 12 ऑक्टोबर रोजी आय आय टी बाॅम्बे संचलित “कोहा व लायब्ररी अॅटोमेशन” या विषयावर एक दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उदघाटन ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ. एस. एस. रंगनाथन् यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. शिरीष कुलकर्णी, निशा करांडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आय आय टी बाॅम्बे यांचे रिमोट सेन्टर असुन या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्या सर्वागिंण विकासासाठी वेगवेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. आता पर्यंत 22 कार्यशाळा या रिमोट सेन्टर च्या माध्यमातून घेतल्या गेल्या असुन याचा फायदा आसपासच्या सर्व महाविद्यालयांना झाला आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन पब्लिक लायब्ररीयन व महाविद्यालयीन लायब्ररीयन यांच्या साठी करण्यात आले होते. लायब्ररी अॅटोमेशन चे सॉफ्टवेअर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालया मार्फत मोफत उपलब्ध केले जात असुन या सॉफ्टवेअर प्रशिक्षण हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. लायब्ररी मध्ये असणा-या विविध पुस्तकांचे संगणकीकृत नियोजन करण्यासाठी आवश्यक असणा-या सॉफ्टवेअर ची संगणक मधुन आज्ञावली प्रस्थापित करण्यासाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये पंढरपूर सह परिसरातील 74 लायब्ररी मधुन नोंदणी करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू, नॅशनल व्हरच्युअल लॅयब्ररी यांचे मुख्य संशोधक प्रा. कंनन, केंद्रीय सांस्कृतिक मंञालय यांचे कुलसचिव, सचिव राजाराम मोहनराॅय लायब्ररीरी फाऊंडेशनचे संचालक अरूमकुमार चक्रवर्ती या सर्वाचे मार्गदर्शन लाभले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डाॅ. शिरीष कुलकर्णी, ग्रंथपाल निशा करांडे, जयश्री महाकोडे, सारिका निकम, विवेक डोंबे, हणमंत गायकवाड, सूर्यकांत जाधव, अमोल नवले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







