पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- आदिवासी कोळी जमातीच्या समाजबांधवांच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न सुटला तरीही पंढरपूर येथील प्रांतकार्यालयात आणखी 100 ते 150 जातीच्या दाखल्यांची प्रकरणे प्रलंबीत ठेवली गेली आहेत. लवकरात लवकर हे जातीचे दाखले मिळाले तर ठीक… अन्यथा आम्ही कोळी जमातीचे तरुण बांधव कार्तिकी यात्रेची श्रीविठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पुजा होत असताना पंढरपूरच्या बाहेर जाऊन स्वत:ला सर्पदंश करवुन घेणार! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक-अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
आम्ही वर्षानुवर्षे केलेल्या अनेक आंदोलनानंतर महादेव कोळी जमातीच्या बांधवांना जातीचे दाखले देण्याचा मार्ग भाजपा सरकारने खुला केला, 85 जणांना जातीचे दाखलेही दिले गेले; परंतु यानंतर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोळी जमात बांधवांना जातीचे दाखले वेळेत मिळत नाही.
गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्या आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांचा जातीच्या दाखल्यांसाठीचा लढा चालु होता. परंतु महर्षी वाल्मिकी संघाने अनेक वर्ष सातत्याने विविध प्रकारची आंदोलनं करुन, मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदने देऊन कोळी जमात बांधवांना न्याय मिळवून दिला आहे. तब्बल 70 जणांना महादेव कोळी जमातीचे जातीचे दाखले मिळविण्यात यश मिळवले आहे. यापुढे सुरळीतपणे शासकीय आदेशानुसार सर्वांनाच जातीचे दाखले मिळतील असे वाटत असतानाच पुन्हा 100 जणांनी मागणी करुनही त्यांना जातीचे दाखले अद्याप मिळालेले नाहीत. या सर्वांना जातीचे दाखले त्वरीत मिळायला हवे होते मात्र मंत्रालयातून आदेश येऊ द्या.. असे अधिकार्यांकडून सांगितले जाते व टाळाटाळ केली जाते. हे असे आणखी किती दिवस चालणार?
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे आदेश असुनही प्रशासकीय स्तरावरुन कोळी जमातीचे दाखले देण्यासंदर्भात कसलीही कार्यवाही केली जात नाही. जातीचे दाखले मिळण्यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती पावले त्वरीत उचलावीत. अन्यथा येत्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी मंत्रीमहोदयांकडून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापुजा होत असताना पंढरपूरच्या बाहेर जाऊन विषारी सापांचे डंख स्वत:ला घेवुन आपले जीवन संपवुन टाकु. व आमच्या या बलिदानाला शासन स्वत: जबाबदार राहीन. असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
पंढरपूरच्या बाहेर करणार प्राणार्पण- आम्ही बलिदान दिले तर किमान आमच्या पुढील पिढीला तरी न्याय मिळेल. त्यामुळे आदिवासी कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्यांसाठी आम्ही हे कठोर पाऊल उचलणार आहोत. परंतु आमच्यामुळे पंढरीत वारीनिमित्त आलेल्या विठ्ठलभक्तांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी आम्ही आमचे प्राणार्पण पंढरपूर शहराच्या बाहेर करणार असल्याची माहितीही श्री.अंकुशराव यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com