👁 10 Views

गोर-गरीब माता भगिणींना प्रांताधिकारी ढोले यांचे शुभहस्ते साड्यांचे वाटप… मातोश्री मीराबाई महाराज सुर्यवंशी सेवाश्रम व शिवक्रांती युवा संघटनचा संयुक्त सामाजिक उपक्रम!

पंढरपूर LIVE 20 नोव्हेंबर 2018

भुवैकुंठ पंढरीतील मातोश्री मीराबाई महाराज सुर्यवंशी सेवाश्रम व शिवक्रांती_ युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अतिशय स्तुत्य असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पंढरीतील गोर-गरीब, गरजु माता-भगिणींना उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी सचिन _ढोले यांच्या शुभहस्ते हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.

साड्या वाटप झाल्यानंतर उपस्थित सर्व माता-भगिणींना सुग्रास भोजनही देण्यात आले. यावेळी नुतन नगरसेवक निवास बोरगावकर, नगरसेवक, लखन _चौगुले, मीराबाई सेवाश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.नागनाथ महाराज काळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवक्रांतीचे संस्थापक-अध्यक्ष दत्तात्रय काळे, सल्लागार अजिंक्य शिंदे, शहराध्यक्ष सागर चव्हाण, शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख, राकेश मोरे, कुणाल घुले, विकी काळे आदींनी परिश्रम घेतले.

तरुण पिढीतील समाजसेवकांचा हा उपक्रम खुप भावला-प्रांताधिकारी सचिन ढोलेहल्लीच्या बदलत्या काळात कांहीजण स्वत:च्या आई-वडिलांना, भावंडांना व बायका-लेकरांनाही व्यवस्थित सांभाळताना आढळत नाहीत. परंतु कांही तरुण समाजसेवक मात्र अतिशय मौलिक व कौतुकास्पद कार्य करताना आढळून येताहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजेच शिवक्रांती युवा संघटनने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम आहे. हा उपक्रम मला खुप भावला. तरुण समाजसेवकांच्या मनात असा विचार येणे व तो आमलात आणणे ही खुप मोठी गोष्ट आहे. ‘शिवक्रांती’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविल्या या उपक्रमापासून इतरांनाही निश्‍चितच प्रेरणा मिळेल व असे उपक्रम सामाजिक संघटना व संस्था राबवतील. असे मत यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केले.   

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *