पंढरपूर LIVE २३ नोव्हेंबर 2018
खेडभाळवणी गावातील वाड्या वस्त्यावर सिंगल फेज विज सोडण्यात यावी यासाठी ग्रामस्थ व सांगोल्याचे युवा नेते दिग्विजय पाटील यांच्या वतीने कार्यकारी अभियंता महावितरण पंढरपूर या ठिकाणी निवेदन देण्यात आले .
सध्या सरकार 24 तास वीज देऊ व ज्या ठिकाणी वीज नाही त्या ठिकाणी वीज पुरवठा करु अशा योजनांची घोषणा करत आहे , पण खेडभाळवणी गावातच सब स्टेशन पण गाव अंधारात अशी स्थिती गावात झाली आहे . 
विज पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून सबस्टेशनसाठी गावाकडुन आर्थिक मदत ही करण्यात आली असून या गावात नव्याने सबस्टेशन सुरू झाले असून या सब स्टेशन वरून इतर कौठाळी फिडरवर सिंगल फेज विज सोडण्यात येते पण खेडभाळवणीतील फिडरवर सिंगल फेज विज सोडण्यात येत नाही . यावरून महावितरण दुजाभाव करत आहे असे ग्राहकाचे म्हणणे आहे . या गावातील वाड्यावरील ग्रामस्थांना राॅकेल भेटत नसुन त्यांना आपले दैनदिन कामे ही दिवसाबरोबर करावी लागत आहेत तर रात्रीची विज नसल्यामुळे स्त्रियांना स्वयंपाक करण्यासाठी दुपारीच तयारी करावी लागत आहे . रात्री उजेडासाठी गोडे तेलाचा दिवा लावावा लागत असुन विद्यार्थ्यांना या दिव्या पुढे आपला अभ्यास करावा लागत आहे याचा परिणाम विद्यार्थ्यीचा शिक्षणावर होत आहे . तसेच सध्या पंचक्रोशीत बिबट्या सदृश्य प्राणी व इतर वन्यजीव दिसल्याची चर्चा असुन नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . तरी पूर्वी या गावांमध्ये सिंगल फेज विज ही शिरढोण सबस्टेशन वरुन सोडण्यात येत होती पण नवीन सबस्टेशन गावातच झाले नंतर का सोडता येत नाही ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे .यावरुन महावितरण ग्राहकाची स्थिती ही मातीतून उठुन फफुटात बसल्यासारखी झाली आहे . महावितरण ग्राहकाची मागणी आहे आम्हाला कुठूनही वीज सोडा पण आम्हाला विज सोडा अशी मागणी होत आहे . महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत असे महावितरण ग्राहकाच्या वतीने सांगण्यात येत आहे तरी लवकरात लवकर विज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा सब स्टेशनला टाळे ठोकुन आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी खेडभाळवणीतील ग्रामस्थ उपस्थित होते .
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







