पंढरपूर LIVE 8 डिसेंबर 2018
पंढरीतील “निसर्ग संवर्धन” या सामाजिक संस्थेने हाती घेतलेल्या एका स्तुत्य उपक्रमाचा पंढरपूर लाईव्ह ने घेतलेला हा आढावा… संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व पंढरपूरकरांचे अभिनंदन!
गोपाळपूर जवळ नदीपात्रातील पुष्पावती आणि चंद्रभागा नदिच्या संगमस्थानी असणारे विष्णुपद हे सुंदर निसर्गरम्य,शांत,व प्रसन्न मंदिर. याच ठिकाणी ” मार्गशीर्ष”महीन्यात देवाच वास्तव्य असत अशी आख्यायिका आहे.पण पंढरपुरातील या पक्षीतिर्थ “विष्णुपदाला” अस्वच्छतेने अक्षरशः ग्रासले आहे.
(प्लॅस्टीक बाटल्या,ग्लास,पत्रावळ्या,कापड,)
या परिसरात अनेक पाणपक्षांचा वावर असतो.पाणी स्वच्छ व शुध्द करण्या करीता निसर्गनिर्मात्याने निर्माण केलेल्या पक्षांच्या-प्राण्यांच्या व मनुष्याच्याही जिवाला धोका होईल अशी वाईट परिस्थिती येथे अस्वच्छेतेमुळे झालेली आढळते.
वर्तमानकाळातील धोके ओळखूनच ” निसर्ग संवर्धन,पंढरपूर ” या संस्थेने मागील वर्षी पासुन विष्णुपद स्वच्छता अभियान राबवण्यास प्रारंभ केलाय. सर्वच्या केली पण पुन्हा मार्गशीर्ष महीना आला की तीच परिस्थिती निर्माण झाली.
या अस्वच्छतेला दुर करण्याकरीता या संस्थेने पुन्हा कंबर कसली असुन वर्षभर साठलेला कचरा उचलुन परिसर सर्वत्रच केला आहे. यासाठी संस्थेचे अनेक कार्यकर्ते स्वयंस्फुर्ततेने सहभागी झाले होते. पंढरपूर नगरपरिषदेनेही चार सर्वच्या कर्मचारी व दोन कंटेनर पुरवले होते. विष्णुपदाचा संपुर्ण परिसर चकचकीत केला आहे. याठिकाणी स्वच्छता राखावी यासंबंधीचे फलकही लावण्यात आले आहेत. यावरच आम्ही थांबत नाही तर दर रविवारी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूरकरांनीही हातभार लावुन सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. अशी माहिती शेटे यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना दिली आहे.
पंढरपूरकरांना आवाहन
” निसर्ग स्वच्छतेच्या ” मोलाच्या कामात मदत करावी हिच अपेक्षा.
१) कृपया आपण जेवन करून केलेला कचरा लगेच ऊचलून कचरा कुंडीत टाका.
२)आपल्या मित्रमंडळींनाही सांगा की या ठिकाणी कचरा करू नका.
३) निसर्ग हा आपल्या सर्वांचा आत्मा आहे आणि तो स्वच्छ ठेवण आपल काम न्हवे तर कर्तव्य समजून एकजूटीन आम्हला साथ द्या, सहकार्य करा व ” विष्णुपद ” परीसर प्लास्टिक व कचरा मुक्त करुयात.
प्रत्येक रविवारी दू १२ ते २:०० या वेळेत..
सुरवात ९/१२/२०१८ पासुन
अधिक माहितीसाठी संपर्क
श्रीकांत बडवे
Mobile 97636 32528
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com









