👁 9 Views

कुर्डुवाडीतील नूतन विद्यालयात स्वेरीचा ‘व्यवसाय मार्गदर्शन मेळावा’ संपन्न

पंढरपूर LIVE ११ डिसेंबर २०१८

स्वेरीतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन 
            – चेअरमन प्रभाकर चिंचवडकर
पंढरपूर-(संतोष हलकुडे)‘स्वेरी शिक्षण संकुलाने आपल्या पंढरपूर पॅटर्नच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणारी इंग्रजी भाषा  व तंत्रशिक्षणाची भीती दूर केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी आता उच्चतंत्रशिक्षण घेवून स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.  स्वेरीने आता सराव वर्गावर भर देण्याची गरज आहे.’ असे प्रतिपादन नूतन प्रशालेचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर यांनी केले.
          श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूर यांच्यातर्फे कुर्डुवाडी मधील नूतन हायस्कूलमध्ये स्वेरीचा ‘व्यवसाय मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला. यावेळी नूतन प्रशालेचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर हे स्वेरीतील तंत्र शिक्षणाबद्धल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके आणि सहशिक्षकांनी स्वेरीतील प्राचार्य डॉ. रोंगे आणि इतर प्राध्यापकांचे स्वागत केले. दीपप्रज्वलनानंतर प्रा. एच.व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्तविकात हा मेळावा आयोजित करण्याचा हेतू सांगितला. प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रीयेवर प्रकाश टाकून विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात प्रवेश घेताना नेमके कोणत्या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यावे याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की,’आपली आवड आणि असणारे ध्येय यात खूप फरक असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर त्याला कुठेही संधी मिळते आणि त्यात तो यशस्वी होतो. करियर मजबूत करण्यासाठी प्रथम पाया मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी हार्डवर्क आवश्यक आहे आणि हार्डवर्क हेच यशाचे गुपित आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील उणीवा शोधून बदल केल्यास यशाचा मार्ग निश्चित सापडेल.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी अनेक यशाची गुपिते उलगडली. या मार्गदर्शन मेळाव्यामुळे कुर्डुवाडी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे महत्व समजले. या मेळाव्यात तंत्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज व स्वयंरोजगारासाठी वित्तपुरवठ्याबद्धल मार्गदर्शन,प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन,विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन करून तंत्र शिक्षणातील नोकऱ्यासंबंधी माहिती देण्यात आली. यामध्ये संयोजकांनी अप्रतिम नियोजन केल्याचे दिसून येत होते. सचिव डॉ. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली समन्वयक प्रा. एच.डी.कोरडे तसेच प्रा. प्रा.एस .एन. मोरे,प्रा. एस.डी. भिंगारे, प्रा. एस.एस. गायकवाड, गणेश पवार आदी प्राध्यापकांच्या सहकार्याने मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी इंग्लीश मिडीयमच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा चिंचवडकर उपस्थित होत्या.  सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार नूतन विद्यालयाचे सहशिक्षक विजयकुमार कन्हेरे यांनी मानले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *