👁 14 Views

पत्रकारावरील हल्ल्याचा पंढरीत कांॅग्रेसच्या वतीने निषेध

पंढरपूर LIVE 11 डिसेंबर 2018


पंढरपूर । प्रतिनिधी,
गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मिडीयाला काही शक्तींपासून जाणीवपूर्वक कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिणामी अवैध धंदेवाले, गावगुंड यांनी त्याचा गैरफायदा घेत पत्रकारांवर प्रत्यक्ष हल्ला करण्यापर्यंत अशा लोकशाहीविरोधी लोकांची मजल पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यात असाच प्रकार यापूर्वी ही घडला असून आता सोलापूर लाईव्हचे संपादक विजयकुमार बाबर व त्यांचे सहकारी जावेद खान यांच्यावर सशस्त्र हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत अशा वृत्ती पत्रकारांना घाबरवू पाहत आहेत. तेव्हा लोकशाहीचा हा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी पत्रकारांना शासनातर्फे योग्य ते संरक्षण ताबडतोब द्यावे व संबंधित आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत घडलेल्या प्रकाराचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने जाहीर निषेध करीत आहोत, अशा अशयाचे निवेदन पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभाग सचिव प्रा.अशोक डोळ यांनी दिले आहे. 
यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ओबीसी अध्यक्ष समीर कोळी, मधुकर फलटणकर, दिपक येळे, बाळासाहेब आसबे, समाधान रोकडे, सुभाष गायकवाड आदि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *