पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018
पंढरपूर: ‘राजकारणाला समाजकारणाची, समाजकारणाला विज्ञानाची, विज्ञानाला जीवनाची, जीवनाला श्रीमंत आणि समृध्द करणारे राजकीय नेतृत्व म्हणजे शरदचंद्र पवारसाहेब. भविष्यातील स्वप्ने वर्तमानकाळात आणणारे महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व आहे.’ असे उद्गार थोर ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी काढले. पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे होते. डॉ. भोसले पुढे म्हणाले ‘समाजातील अनेक स्तरातील लोकांशी नाते त्यांनी हृदयापासून जोडले आहे. सामाजिक, राजकीय, औद्योगिक, साहित्य आणि कला या क्षेत्राशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. मा. शरदचंद्र पवार साहेब सत्तेचा समाजकारणासाठी वापर करणारे भविष्याबदल दूरदृष्टी असणारे नेते आहेत. स्वतःला काळाप्रमाणे बदलून घेणारे, काळाप्रमाणे समाज व्यवस्था बदलणारे नेतृत्व आहे. त्यांनी स्त्रियांना समाजात आणि राजकरणात स्थान निर्माण करून दिले. धर्म म्हणजे कर्मकांड न मानता, माणुसकी हाच धर्म त्यांनी मानला आहे.’ अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य भोईटे म्हणाले,‘ प्रत्येकाच्या जीवनात गुरूला महत्त्व असते. यशवंतराव चव्हाण सारख्या कर्तृत्वान नेतृत्वाच्या मार्गदशनाखाली मा. शरदचंद्र पवारसाहेब घडले. ते सर्व महाराष्ट्रची जान आणि जाणीव असणारे एकमेव नेते आहेत.’ यावेळी व्यासपीठावर कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य एन. एन. तंटक, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. विकास कदम, प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन डॉ. शरद इंगवले, कार्यालयीन प्रमुख श्री. शिवाजी लोभे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. शरद इंगवले यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. कु. आलका घोडके यांनी केले. आभार डॉ. एस. पी. शिंदे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षेकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने व्याख्यानाची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com