👁 9 Views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्या पंढरीत सुसज्ज भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा

पंढरपूर LIVE 16 डिसेंबर 2018


उद्या सोमवार दि. 17 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजतामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते श्रीविठ्ठल रुक्मिणी भक्त निवास या वास्तुचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
सर्व्हे नंबर 59, भक्ती मार्ग पंढरपूर येथे मंदिर समितीच्या जागेत उभारण्यात आलेल्या या भक्तनिवासाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
पंढरीत आलेल्या भाविक भक्तांना सर्वसोयींनियुक्त सुरक्षित वास्तव्य करता येईल. अशा सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा या भक्तनिवासामध्ये उपलब्ध आहेत.  

    
शहरातील पहिली भक्त निवासाची ग्रीन इमारत 


पंढरपूर : आय जी बी सी इंडियन ग्रील बिल्डिंग काँसिलिंग संस्थेकडे अधिकृत पणे नोंद असलेली सोलापूर जिल्ह्यातील पहिली ईमारत म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून बांधण्यात आलेले भक्त निवास ची ईमारत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या क्तांसाठी भक्तनिवास उभारणी करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्वे नंबर 59 येथे करण्यात आलेले आहे. यामध्ये अंदाजे बाराशे भाविक राहतील अशी उभारणी करण्यात आलेली आहे.
या भक्त निवासमध्ये आठ लोकांना एकत्र राहता येईल असेल ७८ हॉल तयार करण्यात आले आहेत. तसेच पाच लोकांना एकत्र राहता येईल असे 63 हॉल तयार करण्यात आले आहेत. २ बेड असलेल्या ८१ रूम, दोन वेळच्या व्हीआयपी वातानुकूलित ५१ रूम, व्ही आय पी ८ सूट, व्हींव्हीआयपी ६ सूट अशी राहण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी वन बीएचके फ्लॅट देखील तयार करण्यात आले आहेत. एकाच वेळेला अनेक लोक जेवण करतील असे सुसज्ज रेस्टॉरंट आहे. भक्तनिवास परिसरात आग लागल्यास तुरीत आग बुजविण्यासाठी पाण्याचा फवारा पाडणारे यंत्र बसवण्यात आले आहे.
त्याचबरोबर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेण्यासाठी २२०० चौरस मीटरचे लॉन व १५ बाय ०९ मीटरचा स्टेज देखील तयार करण्यात आला आहे. भक्तनिवास च्या दर्शनी बाजूस ४३ गाळे देखील बांधण्यात आले आहेत. तसेच २७३ चार चाकी वाहने व २०० दुचाकी वाहने बसतील अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी संतांचे ११ चित्र लावण्यात येणार आहेत.

पंढरीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री आल्यास त्यांना राहण्यासाठी भक्त निवास मध्ये व्ही व्ही आय पी रूम तयार करणे आल्या आहेत. यामध्ये विशेष सुविधा देण्यात आले आहेत. तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक यांच्यासाठी देखील राहण्याची व कार्यालयाची सोय आहे.

इको फ्रेंडली इमारत
शौचालयासाठी वापरले जाणारे पाणी पूर्ण शुद्धीकरण करून झाडांसाठी वापरण्यात येईल. रेन वॉटर पावसाचे पाणी एकत्र करून भुयारी टाकीमध्ये साठवून त्यावर प्रक्रिया करून विंधन विहिरीत सोडले जाणार आहे. तसेच त्याठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आले आहे.  त्या परिसरात साठणारा कचरा वर्गीकरण करून खत निर्मिती करण्यात येणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प राबवून वीज निर्मिती करण्यात येणार आहे.

भक्तनिवासचे नामकरण
मंदिर समितीकडून बांधण्यात आलेल्या भक्तनिवासचे नामकरण “श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास” असे करावे अशी सूचना समितीच्या माधवी निगडे यांनी सूचना मांडली होती. असं मंदिर समितीने सर्वानुमते मान्यता दिली आहे.


चार वींगला संताची नावे
ज्ञानदेवे रचिला पाया ! उभारिले देवालया !! नामा तयाचा किंकर ! त्याने केला हा विस्तार !! जनार्दन एकनाथ ! खांब दिला भागवत !! तुका झालासे कळस! भजन करा सावकाश!!
या चार अस्तंबा प्रमाणे भक्तनिवासाची उभारणी झाली असल्याने भक्तनिवासातील चारही विंगला श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत नामदेव महाराज या संतांची नावे देण्यास येणार आहेत

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *