👁 10 Views

हेळंब (ता.परळी वै.) येथील श्री खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धोत लक्षवेधी लढती

पंढरपूर LIVE 18 डिसेंबर 2018


हेळंब येथील तीन दिवशीय खंडोबा यात्रोत्सवाची उत्साहात सांगता 

हलगीच्या तालावर हेळंब येथे रंगली कुस्त्यांची दंगल

कुस्तीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील 
हेळंब येथे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. श्री खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने पहेलवान मंडळींची उपस्थिती होती व प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित पाहण्यास मिळाली. 
    हेळंब येथे जागृत असे श्री.खंडोबाचे मंदिर आहे. चंपाषष्ठी निमित्त हेळंब येथे गुरूवार पासुन तीन दिवशीय यात्रेस प्रारंभ झाला.  विविध खेळणी साहित्याचे दुकाने गावात थाटण्यात आली आहे. गुरुवारी राज्याच्या कानाकोपर्‍यातुन खंडोबाच्या दर्शनासाठी हजारोंच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. यात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षी शनिवारी (दि.13) डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कुस्ती  स्पर्धोत नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. तसेच कुस्त्या पाहण्याची कुस्तीप्रेमींना संधी मिळाली.
          
या कुस्ती स्पर्धोचे दुपारी 3 वाजेल्यापासून कुस्तीला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच याठिकाणी लहान मुलांच्या कुस्ती देखील चांगल्याच रंगल्या होत्या. कुस्त्यांमध्ये बीड,लातुर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटू सहभागी (पहेलवानांचा) घेऊन उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणच्या मल्लांनी सहभाग घेतला होता. यांच्यातील रोमहर्षक लढतीत प्रथम क्रमांकाची कुस्ती विश्वांभर खाडे व हरि गोरे यांच्या लढत होऊन जोड काढण्यात आली. विजय संपादित केला. पहेलवानांची लढत रंगतदार झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारे प्रेक्षणीय सामन्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. 
या कुस्ती स्पर्धोमध्ये 100, 500, 1000, 1500, 2000, 3000,  5001/- हजार रूपये बक्षीसांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्ती स्पर्धेचे ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केले. विजेत्या मल्लास गावातील मुख्य मार्गनी वाजत गाजत मिरवणूक काढुन जंगी स्वागत करण्यात येते.
        या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते मधुसूदन होळंबे, चेअरमन महादेव होळंबे, जि.प.सदस्य संजय दौंड, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. सुरेश चौधरी, पंचायत समितीचे सदस्य भास्कर फड, हाळमचे सरपंच विनायक गुट्टे, इंजि. गित्ते, पोलिस दत्तात्रय गित्ते, पोलिस पाटील सुंदराव आंधळे, गणपतराव आंधळे, प्रा.नारायण पाळवदे, बालाजी आंधळे, ब्रम्हमाचारी नवनाथ महाराज आंधळे, पोलिस उपनिरीक्षक पुणे रामचंद्र केदार, मृदंगाचार्य प्रल्हाद आंधळे, इंद्रजित होळंबे, बालाजी होळंबे गुरुजी, भास्कर आंधळे गुरुजी, ज्ञानोबा पांडुरंग आंधळे, बब्रवान होळंबे गुरुजी, ह.भ.प.वैजनाथ महाराज शिंदे, व्यकंटी होळंबे, पाटील पाळवदे गुरुजी, यशवंतराव होळंबे गुरुजी, पत्रकार महादेव गित्ते, केशवराव गित्ते,  मनोहर पाळवदे, परमेश्वर पाळवदे, पपन होळंबे व सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई अशोकराव होळंबे व उपसरपंच सौ.लक्ष्मीबाई राम पाळवदे व ग्रामपंचायत सदस्य सौ.मंदोदरी सुधाकर होळंबे, सौ.द्वारकाबाई विश्वनाथ आंधळे, वैजनाथ भानुदास आंधळे ,दत्तू वामन लांडगे, सौ.बबिता परमेश्वर होळंबे,दत्ता मुंजा पाळवदे, सौ.भारतबाई भानुदास पाळवदे, वैजनाथ होळंबे व ग्रामस्थांनी यांनी काम पाहिले. संभाजी आंधळे यांनी समोलचन केले आहे. या कुस्तीचे सामने यशस्वी करण्यासाठी पद्माकर आंधळे गुरुजी, केशव होळंबे (महाराज), तुकाराम होळंबे गुरुजी, रामेश्वर होळंबे सैनिक, मोहन होळंबे, कारभारी होळंबे, काशीनाथ पाळवदे आदींनी परिश्रम घेतले. राम पाळवदे यांच्या शेतातील प्रांगणात रंगलेल्या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

तीन दिवशीय खंडोबा यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता
      खंडोबा यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातुन भक्त दर्शनासाठी आले होते. तीन दिवशीय यात्रा उत्साहात झाली. गुरुवारी
 सकाळी गावातुन खंडोबाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब नगरी दणाणुन गेले होते. पालखीचे ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवणून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला. ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. शुक्रवारी वाघ्या मुराळ्याचा कार्यक्रम झाला.श्री खंडोबा यात्रेनिमित्त परंपरागत चालत आलेल्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा हे मुख्य आकर्षण होय. शनिवारी कुस्त्यांची स्पर्धा घेण्यात आली.  
यात्रेनिमित्त दर्शनासाठी व खेळणीचे दुकानावर गर्दी 
श्री.खंडोबा यात्रोत्सवा निमित्ताने राज्यातुन, जिल्ह्यातुन, तालुक्यातील , ग्रामस्थ व परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री खंडोबा मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असल्याने परिसरात खाद्य पदार्थ, खेळणी, वस्तू आदींसह विविध  व वस्तू खेरदी  व दर्शना साठी भाविकांची गर्दी होत आहे. यात्रेनिमित्त खेळणीचे दुकाने थाटली होती. भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा समितीने व परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरात  कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त  ठेवण्यात आला होता.
यावेळी ग्रामस्थांनी व आदी भक्त मंडळीनी तीन दिवशीय यात्रोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

हलगीने वाढविली कुस्तींमध्ये रंगत 
तालुक्यातील हेळंब येथे श्री. खंडोबा यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. राम पाळवदे यांच्या शेतात कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये  या कुस्ती दंगलींमध्ये अनेक जिल्ह्यातील पहेलवांनी आपले कसब दाखवीत होते. दरम्यान हलगीच्या तालावर पहेलवानांचा देखील उत्साह संचारला होता. कुस्ती म्हटली म्हणजे हलगी आली. कुस्त्यांमध्ये जसजशी चुरस वाढत होती. तसे तसे हलगीच्या ताल कुस्तींपटूंमध्ये उत्साहत संचारत होता. त्यामुळे हलगीने कुस्तींमध्ये रंगत वाढविली होती. चित्तथरारक सामने पाहण्यासाठी तालुक्यातील विविध गावचे हजारों कुस्ती प्रेमीं उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *