पंढरपूर LIVE 18 डिसेंबर 2018
आटपाडी ता.15 (प्रतिनिधी) गदिमांच्या जन्मशताब्दी निमित्त बजेटला धरलेले 5 कोटी रुपये आणि आणखी 17 कोटी रुपये मंजूर करुन एकूण 22 कोटी रूपये तातडीने खर्च करीत शेटफळे,माडगूळे,आटपाडी आणि पूणे येथे स्मारकांच्या पूर्ततेसाठी शिवसेना – भाजप सरकारमध्ये विशेष महत्व असलेले खानापूर – आटपाडीचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य,गदिमा स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटीक यांनी केले आहे.
गीत रामायणकार,महाकवी ग.दि.माडगूळकर यांच्या 40 व्या स्मृती दिनानिमित्त आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूलमध्ये आयोजित स्मृती दिनानिमित्त प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी के.बी.जाधव सर हे होते.
जन्मशताब्दी वर्ष सुरु हेाऊन 3 महिने होत आलेत,याच वर्षात लोकसभेची निवडणूक होवू घातल्याने स्मारकांच्या पूर्ततेसाठी फार कमी अवधी उपलब्ध होणार आहे.जन्मशताब्दी वर्षातच चार ही ठिकाणच्या स्मारकांसाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये खर्चावेत आणि जन्मशताब्दी वर्षाच्या विविध उपक्रमांसाठी 2 कोटी रुपये वापरावेत यासाठी आमदार बाबर यांचेच प्रयत्न मार्गी लागू शकतील असे स्पष्ट करुन सादिक खाटीक यांनी, प्रचंड साहित्यीक कर्तृत्व असलेले,150 मराठी,20 हिंदी चित्रपटांच्या पटकथा,हजारो गीते,कविता लिहिणाऱ्या गदिमांना शासनाने पदमश्रीने गौरविले होते.12वर्षे आमदार,साहित्य परिषद,साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भुषविलेल्या,गीत रामायणाला जागतिक मान्यता मिळालेल्या गदिमांना, राज्याचा “महाराष्ट्र भुषण” आणि केंद्राचा सर्वोच्य “भारतरत्न” हा नागरी सन्मान प्रदान करुन त्यांचा मरणोत्तर गौरव केला जावा अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.
गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रत्येक महिन्याला कवी संमलेन घेणाऱ्या राजारामबापू हायस्कूल येथील उपक्रमाची सुरुवात करणारे भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील यांनी माणदेशात,आटपाडीत सर्वप्रथम गदिमांची स्मृती जतन करण्याचे काम 1980 च्या दशकात केल्याचे सादिक खाटीक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत,सुत्रसंचालन दादासाहेब मोटे सर,बाळासाहेब चव्हाण सर यांनी केले.यावेळी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
आटपाडी ता.15 (प्रतिनिधी) गदिमांच्या जन्मशताब्दी निमित्त बजेटला धरलेले 5 कोटी रुपये आणि आणखी 17 कोटी रुपये मंजूर करुन एकूण 22 कोटी रूपये तातडीने खर्च करीत शेटफळे,माडगूळे,आटपाडी आणि पूणे येथे स्मारकांच्या पूर्ततेसाठी शिवसेना – भाजप सरकारमध्ये विशेष महत्व असलेले खानापूर – आटपाडीचे आमदार अनिलभाऊ बाबर यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य,गदिमा स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटीक यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com