👁 8 Views

शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणार्‍यांवर पंढरपूर तालुक्यात मोठी कारवाई…. 1 लाख 10 हजार रुपये दंड वसुल! नियमबाह्य तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारांची माहिती द्या- पोलिस निरीक्षक धनंजय जाधव

पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018

केंद्र व राज्य सरकारने  सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहीरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन) कायदा पास केला असुन, या कायदया अंतर्गत पोलिस ठाणे पंढरपुर तालुका हदद्ीत आज विविध नियमांखाली शाळा, महाविदयालये, सार्वजनिक ठिकाण इत्यादी ठिकाणी एकाच वेळी मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 1 लाख 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला असुन आपल्या भागात अशा प्रकारे नियमबाह्यपणे तंबाखुजन्य विक्री करणारे आढळल्यास याची माहिती  पंढरपूर तालुका पोलिसांना द्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.

या नियमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादनांच्या जाहीराती करणे, 18 वर्शाखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे, शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकणे , तंबाखुजन्य पदार्थाच्या पॅकेटच्या आवरणावर 85 टक्के भागात वैधानिक इशारा नसणे इत्यादी नियमभंगाखाली 55 ठिकाणी कारवाई करण्यात आली असुन, मोठया प्रमाण दंड वसुल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलिस अधिक्षक श्री.मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.श्री.सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर तालुका पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक धनंजय अ.जाधव , पोलिस उपनिरीक्षक वसगडे, पोसई/मुलाणी व ईतर पोलिस कर्मचारी यांनी हिरिरीने सहभाग घेवुन केली आहे. 

पोलिस: कारवाईची ठिकाणे:- गोपाळपूर, रोपळे, नारायणचिंचोली, आढीव, पुळूज, कासेगाव, खर्डी, टाकळी, गुरसाळे, तारापुर, देगाव इत्यादी.  वसुल तडजोड रक्कम:- 110000 एवढी असुन सदरची कारवाई यापुढेही चालु राहणार  असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे.  अशा प्रकारे बंदी असलेल्या तंबाखुजन्य उत्पादनांची विक्री करुन नियमभंग करणारांची माहीती देण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.
    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *