पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018
राज्यातील गोदावरी, भीमा, पंचागंगा, इंद्रायणीसह प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणास पर्यावरण विभागाने प्राधान्या दिले असून, केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
नमामी चंद्रभागातंर्गत पर्यावरण विभागामार्फत पंढरपूरात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृहात आयोजीत बैठकीत पर्यावरण मंत्री कदम यांनी घेतला. यावेळी खासदार अनिल देसाई व विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट , उपवन संरक्षक संजय माळी, मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम पर्यावरण विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विविध परवानगी मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
पंढरपूरच्या विकासाठी पर्यावरण विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून पंढरपूरातील वारकऱ्यांसाठी शौचालये, स्नानासाठी ओटे, चेजिंग रुम उभारली जावीत. या सुविधा महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र असाव्यात. हे काम मार्चअखेर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. वारकरी भाविकांच्या दृष्टिने चंद्रभागेला अन्यन्य साधारण महत्व आहे. चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यासाठी व वारकऱ्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी पर्यारण विभागामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
भीमा नदीकाठावरील 121 गावांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाणी पुनर्वापरात आणण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कामे सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. यासाठी सर्व संबंधीतांची लवकरच बैठक घेतली जाईल असेही पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.
तद्नंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. आणि घाटांची व नदीपात्राची पाहणी केली, तसेच पर्यावरण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणांची पाहणी केली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com